हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेहकरात गस्तीदरम्यान पोलिसावर हल्ला! गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की; तिघांवर BNS अंतर्गत गुन्हा

On: February 13, 2026 7:14 PM
Follow Us:
मेहकरात गस्तीदरम्यान पोलिसावर हल्ला BNS गुन्हा

मेहकर | १३ फेब्रुवारी २०२६

मेहकर शहरातील वाटिका चौक परिसरात गस्तीदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ११) रात्री घडली. मेहकर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेबाबत चर्चा रंगली आहे.

पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी श्रीराम चिमण (वय ३०) हे नियमित गस्त घालत असताना एमएच-२८-बीएच-६६६८ क्रमांकाच्या दुचाकीवर तिघेजण ट्रिपल सीट बसून आरडाओरड करत जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाहन थांबवून विचारणा केली असता आरोपी मुजाहीद मुकद्दर कुरेश (१८, रा. इमामवाडा, मेहकर) याने पोलिसांच्या गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.

यावेळी शेख बिलाल शेख अयाज (१८, रा. इमामवाडा) आणि रेहान वाजिद कुरेशी (१८, रा. माळीपेठ) यांनी शिवीगाळ करून गोंधळ घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. साक्षीदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

फिर्यादीच्या तोंडी अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कांचन जारवाल करीत आहेत.

गस्तीदरम्यान पोलिस कर्मचाऱ्याशी झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


📌 Related News


📲 अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजात दोन गटांत हाणामारी, नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

कव्वाली संपली अन् वाद पेटला! देऊळगाव राजात दोन गटांत तुफान हाणामारी; शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

शेगावमध्ये जप्त करण्यात आलेल्या बनावट ५०० रुपयांच्या नोटा

शेगावमध्ये ५ लाखांच्या बनावट नोटांचा खेळ; ‘इंडियन चिल्ड्रेन बँक’च्या ९९९ नोटा जप्त

ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेल्या शिंदी ग्रामपंचायतीचे कार्यालय, साखरखेर्डा

ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल, शिंदीत सरकारी जागा वैयक्तिक नावावर केल्याचा आरोप, न्यायालयाच्या आदेशानंतर साखरखेर्डा पोलिसांची कारवाई

देऊळगाव राजा पत्रकार संघटनांचे पदाधिकारी तहसीलदारांना निवेदन देताना

देऊळगाव राजा पत्रकार संघटना आक्रमक: समाजमाध्यमांवरील बदनामीकारक मजकुराविरोधात तहसीलदारांना निवेदन, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार अवैध धंदे बंद करण्याची मागणी करताना डॉ. गोपाल बच्छीरे व शिवसैनिक

लोणारमध्ये गुटखा, वरली-मटका आणि अवैध दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर; १५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

साखरखेर्डा मटण मार्केट वाद सुरू असताना शाळेसमोर जमलेले नागरिक

साखरखेर्डा मटण मार्केट वाद: उर्दू शाळेसमोर दोन गटांत राडा, अखेर पोलिसांनी आखली ५० मीटरची मर्यादा

Leave a comment