हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भरधाव ट्रकची कारला धडक; साखळी फाट्याजवळ भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

On: February 9, 2026 8:18 AM
Follow Us:
बुलढाणा-चिखली मार्गावरील साखळी फाट्याजवळ ट्रक-कार भीषण अपघात

बुलढाणा |९ फेब्रुवारी २०२६

बुलढाणा-चिखली मार्गावरील साखळी फाटा परिसरात रविवारी पहाटे भरधाव ट्रक-कार अपघात घडला. या भीषण अपघातात ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुलढाणा अपघात प्रकरणी ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मृत तरुणाचे नाव महेश कडुबा लोढे (वय ३०, रा. मोहदरी, ता. मेहकर) असे आहे. महेश हा सासूरवाडी भादोला येथून स्वतःच्या कारने (एमएच २८ बीक्यू २४१८) मोहदरीकडे जात होता.साखळी फाट्याजवळील पुलाजवळ चुकीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने (बीआर ०६ जीसी ८४१२) कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, महेश याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. मृतकाचे चुलते केशव माधवराव लोढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विकास सोनुने करीत असून फरार ट्रकचालकाचा शोध सुरू आहे. दरम्यान, बुलढाणा-चिखली मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

या मार्गावर वेगमर्यादा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


📌 संबंधित बातम्या


👉 अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि ग्राउंड रिपोर्टिंगसाठी Kattanews.in ला  Follow करा.

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

हर घर तिरंगा अभियानासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे मोठे आवाहन

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

एअरबॅगमुळे 75 वर्षीय वकिलाचा जीव वाचला; मेहकर येथे आयशरच्या धडकेत कारचा चक्काचूर

मेहकरमधील ज्येष्ठ वकिलाच्या कारला भरधाव आयशरची समोरून धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर

Leave a comment