हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

दुसरबीड येथे लोकनेते स्व. अण्णासाहेब देशमुख यांची जयंती साजरी

Follow Us:
दुसरबीड येथे स्व. अण्णासाहेब देशमुख जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

दुसरबीड | सिंदखेडराजा

दुसरबीड येथे लोकनेते, बुलढाणा जिल्ह्याचे सहकार महर्षी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जिजामाता सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय शंकरराव विठ्ठलराव उर्फ अण्णासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन जिजामाता ग्रीन एनर्जी लिमिटेड साखर कारखान्याच्या परिसरात करण्यात आले होते.यावेळी स्व. अण्णासाहेब देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हरिभाऊ राजे जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर उत्तमराव देशमुख यांनीही पुष्पहार अर्पण करून लोकनेत्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

सहकार चळवळीच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. अण्णासाहेब देशमुख यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. त्यांच्या विचारांचा व सहकाराचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा प्रतिनिधी प्रा. दिलीप नाईकवाड यांनी याप्रसंगी स्व. अण्णासाहेब देशमुख यांच्या सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

👉 अशाच स्थानिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in नियमित वाचा.

संबंधित बातम्या :

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

Leave a Comment