हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

दादांच्या आठवणीतले केनवड गाव हळहळले! शिवस्वराज्य यात्रेतील त्या शब्दांनी डोळे पाणावले

Follow Us:
केनवड येथे दादांच्या आठवणीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना कार्यकर्ते

वाशिम |३१ जानेवारी २०२६

केनवड : “दादा गेले…”
हे दोन शब्द उच्चारताच संपूर्ण केनवड गाव शोकसागरात बुडाले. निर्भीड, परखड आणि स्पष्ट वक्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक लाडका नेता गमावला आहे.

शिवस्वराज्य यात्रेदरम्यान रिसोड तालुक्यातील केनवड गावात घडलेली ती मध्यरात्रीची भेट आजही कार्यकर्त्यांच्या मनात कोरली गेली आहे. रात्री साधारण दोन वाजताच्या सुमारास दादांचे ते शब्द आजही कानात घुमतात.

“अरे अंकुश, मी तुला बजावून सांगितलं होतं की आराम करा… आता किती वाजले?”
या आपुलकीच्या शब्दांतून दादांचा माणुसकीचा स्वभाव प्रत्ययास आला होता.

त्यावेळी गजानन गोळे या सच्च्या कार्यकर्त्याशी रात्री एक वाजता केनवड येथे झालेली भेट अत्यंत भावनिक ठरली.
“आता नीट घरी जा रे बाबा… घरी लेकरं-बाळ वाट पाहत असतील!”
दादांनी प्रेमाने उच्चारलेले हे शब्द आज आठवणींमध्ये जिवंत झाले आहेत.

कार्यकर्त्यांवर असलेले दादांचे प्रेम, माया आणि काळजी प्रत्येक भेटीतून जाणवत होती. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने केनवड गावासह संपूर्ण परिसर हळहळला आहे.

लाडक्या नेत्याच्या आठवणी जागवत केनवड गावातील चाहत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “दादा, आपण कायम आमच्या स्मरणात राहाल” अशा भावना प्रत्येकाच्या डोळ्यांतून व्यक्त होत होत्या.

👉 अशीच भावनिक, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला Follow करा

राजकीय, सामाजिक, ग्रामीण आणि स्थानिक बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

संबंधित बातम्या

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक २०२७ पाहताना महाराष्ट्रातील विद्यार्थी

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! पाहा, परीक्षा कधीपासून सुरू होणार

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

Leave a Comment