हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

खंडाळा मकरध्वज जि.प. शाळेत गंभीर प्रकार! खोट्या कागदपत्रांतून आर्थिक लाभ घेतल्याचा मुख्याध्यापकांवर आरोप

On: January 22, 2026 7:16 AM
Follow Us:
खंडाळा मकरध्वज जि.प. शाळेतील मुख्याध्यापकांवरील कथित आर्थिक फसवणूक प्रकरण

चिखली | २२ जानेवारी २०२६

खंडाळा मकरध्वज (पं. स. चिखली) येथील जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत असलेल्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही तसे दाखवणारी खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कथित प्रकारातून आर्थिक स्वरूपाचा लाभ पदरात पाडण्यात आल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

खंडाळा मकरध्वज येथील जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय अवचितराव पवार हे प्रत्यक्षात मुख्यालयी राहत नसतानाही मुख्यालयी राहत असल्याचे खोटे पुरावे सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या माध्यमातून त्यांनी शासनाकडून आर्थिक लाभ घेतल्याचा संशय व्यक्त केला जात असून, हा प्रकार संवैधानिक व प्रशासकीय नियमांचा गंभीर भंग करणारा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापकांची सखोल व खातेनिहाय चौकशी करण्यात यावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी ठाम मागणी विनोद साळवे यांनी जिल्हा परिषद बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

या तक्रार अर्जाच्या प्रतिलिपी मा. जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच मा. जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडेही सादर करण्यात आल्या असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील पारदर्शकता, शिस्त आणि नियमपालनाबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत असताना, अशा स्वरूपाचे आरोप समोर आल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशीअंती दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


KattaNews.in – शासन, प्रशासन व जनहिताशी संबंधित प्रत्येक गंभीर विषय निर्भीडपणे मांडणारे विश्वासार्ह न्यूज पोर्टल. अशाच सत्य आणि परिणामकारक बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

KattaNews.in Follow करा


 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे पोलिसांची कारवाई

मेहकर तालुक्यात मोठी कारवाई; देऊळगाव साकर्शा येथे १ क्विंटल २६ किलो गोमांस जप्त, दोघांना अटक

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दोन आस्थापनांवर कारवाई करत तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता करण्यात आली.

शेगावात बालकामगारांविरोधात मोठी कारवाई; दोन आस्थापनांतून 3 बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता

Leave a Comment