वाशीम जिल्हा प्रतिनिधि/नारायणराव आरु पाटील
दि.३० सप्टेंबर) रोजी कोलार येथील परेश गावंडे हे शेतामध्ये त्यांची बैल जोडी घेऊन जात असताना त्यांना सकाळी १० वाजता भला मोठा साप दिसून आला त्यानंतर त्यांनी ताबड़तोड़ निसर्ग स्पर्श फाउंडेशन मंगरूळपिर टीम चे सदस्य तथा वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीमचे अध्यक्ष श्रीकांत डापसे यांना कॉल केला आणी सापाबद्दलल माहिती दिली माहिती प्राप्त होताच तातडीने सर्पमित्र श्रीकांत डापसे, सर्पमित्र अतूल डापसे,विष्णु गावंडे. यांनी घटानस्थळ गाठल तेथे त्यांना अजगर बिनवीषारी ( indian rock python )आढळुन आला.
लगेच सर्पमित्रांनी त्या ५ फूट अंदाजे १५ किलो आगाराला यशस्वी रित्यापकडले नंतर RFO जन्मय जाधव साहेब यांच्या मार्गद्शनाखाली व तसेच निसर्ग स्पर्श फाउंडेशन मंगरूळपीर चे संस्थापक अध्यक्ष गौरव कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विषारी ५ फुट अजगराला जंगलामध्ये सोडून देण्यात आले आहे.शेतकर्यांनी मानले सर्पमीञाचे आभार दैनंदिन जीवन जगत असतांना आपल्या घरात परिसरात अंगनात किंवा शेतात कुठेही साप दिसल्यास घाबरुन जाऊ नका किंवा सापाला मारु नका साप हा डायरेक्ट चावा घेत नाही त्यालाही जीवन आहे त्यामुळे याबाबतीत घाबरण्याचे कुठलेही कारण नसुन साप दिसल्यास तातडिने आम्हाला संपर्क करा आम्ही आपल्या सेवेशी २४ तास तत्पर आहो विषारी सापाचे ४ प्रकार आहेत त्यापैकी, घोणस,मन्यार,नाग,फुरसे, आहेत.परंतु सापाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने काहीजन बिनवीषारी सापाला विनाकारण मारतात असे न करता आम्हाला संपर्क करावा असे आवाहन सर्पमीञ श्रीकांत डापसे यांनी केले आहे.