लहुजी शक्ती सेना वाशिम जिल्हा कार्यकारिणी गठीतजिल्हा अध्यक्षपदी मोहनराज दुतोंडे,तर कार्याध्यक्षपदी शंकर पाटील खंडारे.

 

 

वाशिम प्रतिनिधी /नारायणराव आरु पाटील 

 

वाशिम (washim) जिल्ह्याचे लहुजी शक्ती सेना(lahuji Shakti sena) संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या आदेशानुसार लहुजी शक्ती सेना प्रदेश अध्यक्ष कैलास दादा खंदारे, लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र महासचिव वामनदादा भिसे, लहुजी शक्ती सेना पश्चिम विदर्भ महासचिव विष्णू भाऊ शेलार , लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश सदस्य सुनील दळवी, समाजसेवक रामभाऊ बाजड, समाजसेवक गजानन वैरागडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी जाहीर करण्यात आली, याप्रमाणे लहुजी शक्ती सेनेचे नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्यात आले.

 

 

लहुजी शक्ती सेनेचे वाशिम जिल्हा अध्यक्षपदी मोहनराज दुतोडे, लहुजी शक्ती सेना वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष शंकर पाटील खंडारे, लहुजी शक्ती सेना महिला जिल्हाध्यक्ष दुर्गाताई यंगड, लहुजी शक्ती सेना युवा जिल्हाध्यक्ष दीपक लगड, लहुजी शक्ती सेना वाशिम शहराध्यक्ष संतोष माऊली खंदारे, लहुजी शक्ती सेना वाशिम तालुका अध्यक्ष रविभाऊ गायकवाड, मालेगाव तालुका,कारंजा तालुका,रिसोड तालुका, वाशिम तालुका, मंगरूळपीर तालुका, मानोरा तालुका, लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, लहुजी शक्ती सेनेच्या इतर कोर कमिटीचे जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष, महिला तालुकाध्यक्ष, महिला शहराध्यक्ष, या सर्वांच्या नियुक्ती करण्यात आल्या.