
नारायण आरु पाटील, वाशिम/जिल्हा प्रतिनिधी
रिसोड तालुक्यातील रिठद हे गाव सर्वात मोठे असून येथे विविध बँका, पतसंस्था, शिवाजी विद्यालय व महाविद्यालय, मुर्डेश्वर मंदिर गजानन महाराज मंदिर ही प्रसिद्ध संस्थाने असून गाव सुद्धा सदन आहे. हजारो लोक येथे नोकऱ्या करतात. गावच्यालगत वाशिम (washim), मालेगाव व रिसोड तालुक्याच्या सर्व सीमा रिठद (rithad) गावाशी जोडलेल्या असून व्यापारी दृष्टिकोनातून आजूबाजूच्या अनेक गाव खेड्याचा संपर्क आहे.
गावात अवेळी वाद होत असतात, तंटामुक्त गावात हे वाद व्हायला नाही पाहिजेत परंतु हे सर्व वाद पोलीस स्टेशन पर्यंत जात असल्याने नवीन पोलीस स्टेशन निर्मितीची गरज निर्माण होत आहे. लोकसंख्येच्या हिताच्या दृष्टीने रिठद येथे खूप वर्षापासूनची पोलीस चौकीची मागणी होती परंतु ती अद्यापही पूर्ण न झाल्याने व लोकसंख्या वाढत असल्याने वाशिम पोलीस स्टेशन (ग्रामीण)अंतर्गत नवीन पोलीस स्टेशन निर्माण व्हावे हि काळानुसार काळाची गरज आहे.
परंतु प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन होणाऱ्या वादावर व इतर चालणाऱ्या अवैध व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी नवीन पोलीस स्टेशनची नितांत आवश्यकता आहे. चोरीचे प्रमाण सुद्धा भरपूर प्रमाणात वाढले असून त्याबाबत तपास होतांना दिसत नाहीत त्यासाठी नवीन पोलीस स्टेशनची ग्रामीण भागासाठी निर्मिती करावी अशी जनतेतून मागणी होत आहे व ही अपेक्षा पूर्ण होईल अशी गावकऱ्यांची व परिसरातील नागरिकांची मागणी प्रशासन पूर्ण करेल.