नारायण अरु पाटिल/प्रतिनिधि
Washim : बाप्पा खरं सांगा आम्ही कुणाकडे पाहून जगायचं, कुणाकडे पाहून प्रवास करायचा, प्रवास करायचा तर अशा खड्डे पडलेल्या रस्त्याने कसा करायचा हा आमच्यासाठी खरंच यक्ष प्रश्न असून सार्वजनिक बांधकाम विभागाचा आंधळे बहिरेपणाचा कळत झाला, असून आमच्या समस्या बाबत कुणालाच कशी आठवण येत नाही याची प्रचिती अमानी ते रिठद रस्त्यावरील लोकांना, प्रवाशांना वर्षांनुवर्षे येत आहे.
लोकं इतकी त्रासली की आपलं आपलं मागणं मांडावा तरी कुणाकडे दरवर्षी बाप्पा आपली आठवण येते परंतु लोकप्रतिनिधींना जनतेची आठवण मात्र येत नाही येते ती फक्त मताचा जोगवा मागायला आणि या सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव हे सुद्धा शासन दरबारी अमानी ते रिठद या खराब झालेल्या डांबरी रस्त्याची अवस्था मांडत नसल्याचे लक्षात येते.
अमाणी- रिठद या रस्त्यावर एवढे खड्डे पडले आहेत की चार चाकी वाहन चालवणे अवघड झाले, दुचाकी वाहनावाल्यांना मणक्याचे, कमरेचे त्रास होत आहेत तर पायदळ चालण्यासाठी मालेगाव मार्गे अमाणी वरुन रिठद जाण्यासाठी खूप आंतरा मुळे नाईलाजाने ज्या वाहणाचा वापर करावा लागतो. त्यानेच दवाखाना, तहसील, जिल्हा कार्यालय अशा ठिकाणी जावं लागतं त्याबाबत शासन व प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकदाचा काय तो निर्णय घ्यावा आणि या रस्त्यावरील जनतेला एकदाच काय म्हणणं आहे हा रस्ता करायचा किंवा नाही ते सांगितले तर बरं राहील. वारंवार समस्या पेपरमधून बातम्या प्रसिद्ध करून जनहितासाठी प्रसिद्ध होतात.
व अनेक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सुद्धा अमानी-रिठद रस्ता होण्यासाठी बातम्या प्रसिद्ध करण्याचा मानस पत्रकाराच्या माध्यमातून केला जातो. परंतु त्याला वाचा मात्र फुटत नाही. हे सध्याचे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अपयशच म्हणावे लागेल. यामध्ये लोकांच्या समस्यासाठी कोणाला दोष द्यावा याबाबत अमाणी-रिठद रस्त्यावरील जनता साशंक,परेशान आहे.