Washim : खरीपांच्या पिकाचे तातडीने संरक्षण करा,आमदार भावनाताई गवळी पाटील यांचे निर्देश.

 

 

प्रतिनिधी/ किशन काळे रिसोड

 

वाशिम (washim) मालेगाव तालुक्यातील मुंगळा कळंबेश्वर मेडशी वाशिम जिल्ह्यात इतरत्र परिसरामध्ये पडलेल्या ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे या नुकसानीचे सर्वेक्षण तातडीने करावे असे निर्देश आमदार भावनाताई पाटील गवळी यांनी प्रशासनाला दिले आहे. दीर्घ विश्रांती विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. सोयाबीन सोंगणीला हंगामात आलेल्या या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शनिवारी रविवारी रात्री दरम्यान मालेगाव तालुक्यातील मुंगळा कळंबेश्वर मेडशी वाशिम जिल्ह्यामध्ये इतर गावांमध्ये खरिपाच्या पिकाचे मोठ्या परमान नुकसान झालेले आहे.

 

 

 

मोरणा नदीच्या पात्रालगतच्या अनेक शेतजमिनी खरडून गेल्याने शेत जमिनीचे सुद्धा नुकसान झालेले आहे . या नुकसान झालेल्या भागाची पाहणी आमदार भावनाताई पाटील गवळी यांनी केली आहे. ढगफुटी पावसाचे नदी नाल्याच्या पावसाने झालेल्या नुकसान सर्व शेत जमिनीचे नुकसान सर्व शेत जमिनीचे सर्वेक्षण करून सूचना महसूल व कृषी विभागाला दिल्या गेल्या आहेत.यावेळी त्यांच्यासोबत नायब तहसीलदार सुरत सागर शिवसेनेचे प्रदीप पाटील कुटे मंगेश महाराज,विलास जाधव प्रदीप पाटील मोरे मंडळ अधिकारी व तलाठी यांची उपस्थिती होती.