
वाशिम जिल्हा प्रतिनिधि/नारायणराव आरु पाटील
अडोळी परिसरामध्ये सणासुदीच्या काळात विजेचा लपंडाव वाढल्याने अडोळी गावातील नागरीकांचा त्रास वाढला आहे. मागील दहा ते बारा दिवसांपासून मध्यरात्री व सकाळच्या सुमारास विजेचा लपंडाव सुरूअसून, विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. महावितरण कंपनीच्या कुचकामी कारभारामुळे अडोळी येथील नागरिक हैराण झाले आहेत. पाऊस नसतो व वादळ वारा नसते तरीही काही दिवसांपासून गावातील रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचा प्रकार समोर येत आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत. त्यामुळेच विद्युत वितरणने (MSEB) रात्री अपरात्री बंदपडणारा विजेचा लपंडाव थांबवावा अशी मागणी सामान्य नागरिकांन कडून केल्या जात आहे.