वाशीम जिल्हा प्रतिनिधी/ नारायणराव आरु पाटील
सरकारने पोलीस पाटलाच्या मानधनात भरीव वाढ केल्याचे पोलीस पाटील जिल्हाध्यक्ष मंगेशराव सरनाईक यांनी सांगितले, परंतु याबरोबरच सर्व पोलीस पाटलांना अद्याप पर्यंत चार ते पाच महिने होऊन गेले परंतु मानधन मात्र अद्यापही मिळालं नसल्याने पोलीस पाटील संघटनेच्या माध्यमातून मंगेशराव सरनाईक यांनी शासनाकडे मागणी केली. सणासुदीचे दिवस आहेत निदान आता तरी या काळात सर्व पोलीस पाटलांना वेळेत मानधन मिळावे यासाठी पोलीस पाटील जिल्हाध्यक्ष मंगेशराव सरनाईक सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी करत आहेत.
समाज माध्यमांचे व शासन व प्रशासनाचे दूत असलेले पोलीस पाटील यांना या अगोदर ६५००/- रुपये मानधन मिळत होते. १३ मार्च २०२४ च्या मंत्रिमंडळाचे बैठकीत शासनाने १५,०००/- रुपये महिना मानधन मिळेल असा निर्णय घेऊन मानधनात भरीव वाढ केली आहे. परंतु सर्वच पोलीस पाटील सक्षम व समृद्ध नसल्याने आपला घर संसार चालवण्यासाठी पदरमोड करून संसार चालवत आहेत. यासाठी इतर कर्मचाऱ्याप्रमाणे सुद्धा पोलीस पाटलाचे मानधन वेळेतच मिळावे अशी अपेक्षा वाशिम जिल्हाध्यक्ष पोलीस पाटील संघटनेचे मंगेशराव सरनाईक यांनी शासनाकडे केली आहे.