वाशिम : एस टी बस मध्ये महिलेचे दहा हजार रुपये चोरी

 

 

वाशिम

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील

 

 

 

वाशिम : रिसोड इथूनच जवळ असलेल्या वाडी येथील ‘मीरा संदीप मुंडे’ ह्या आपल्या वडिलांच्या गावी जिंतूर डेपोच्या एसटी बसने M H 20 NL 0815 वडिलांच्या गावी म्हणजे जिंतूरला जाण्यासाठी आल्या होत्या. गाडीमध्ये चढत असतांना त्यांचे पाकीट मारले त्यांच्या पॉकेटमध्ये दहा हजार रुपये होते. त्यांचे पाकीट मारले असे त्यांच्या लक्षात येतात त्यांनी आपल्या पाहुण्यांना फोन लावले त्यांचे पाहुणे रिसोड आगारामध्ये येऊन परिस्थिती पाहिली आणि लगेच वाहकास व चालकास भेटून एस टी महामंडळ कंट्रोलला भेटून माहिती घेतली मीरा मुंडे यांनी सविस्तर सांगितले की माझे दहा हजाराचे पाकीट गेले वाहकाला सांगितले तेव्हा वाहक म्हणाले की तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या नंतर पोलीस स्टेशनला कळविण्यात आल्यानंतर रिसोड पोलीस स्टेशनचे तहकीक साहेब व घनवट साहेब यांनी एस टी बस पोलीस स्टेशनला आणून सर्व प्रवाशाची झाडाझडती घेतली.

 

 

 

पूर्ण प्रवासी बस खाली उतरून घेतले. पूर्ण बस खाली झाल्यानंतर ते पाकीट पोलिसांना सापडले पण त्या पाकीट मध्ये फक्त पाच हजार रुपये मिळाले ज्या बाईवर संशय होता त्या बाईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ती बाई पोलिसांना सांगत होती की मी यवतमाळची आहे आणि मी भीक मागून खाते जेव्हा पोलिसांनी त्या लेडीजची पहिली तपासणी तेव्हा त्या थैलीमध्ये फक्त रुमाल सापडला.बाई यवतमाळच्या आणि जिंतूर गाडीत बसते आणि आणि बस मध्ये भीक कशी मागते ? हा पण प्रश्नच आहे ? सर्व चौकशी आणखी पाच हजार रुपये मिळाल्याच्या नंतर मीरा मुंडे यांनी सर्व पोलिसांचे आभार मानले या सर्व चौकशीमध्ये मोलाचे सहकार्य पोलीस तहकीक, घनवट , नागरे, व उपनिरीक्षक गीते साहेब यांचे सहकार्य लाभले वृत्तलेपर्यंत त्या महिले विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.