Washim : सोनल प्रकल्पातंर्गत शेतकऱ्यांचा “हक्काच्या पाण्यासाठी” एल्गार.

Washim sonal प्रकल्प
Washim sonal prakalp

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील  

 

(Washim) जिल्ह्यातील शेलुबाजार सोनल (sonal) सिंचन प्रकल्प लाभक्षेत्रा खाली सर्व शेतकरी बंधूंना व्यापारी बंधूंनी बैठकीला उपस्थित राहावे सोनल प्रकल्पावरून मंगरुळपीर शहरासाठी जाणारी पाणीपुरवठा योजनेच्या विरोधात आपण सर्वांनी जनआंदोलन उभं करण्यासाठी दिनांक १९/१०/२०२४शनिवार ला साई मंदिर शेलूबाजार येथे सर्वांनी उपस्थित राहावे आजच्या बैठकीतील विषय

 

 

१) सोनल प्रकल्पावरून जात असलेली पाणीपुरवठ्याची पाईपचे काम थांबविणे.

२) सोनल प्रकल्प उभारणीच्या वेळी शंभर टक्के पाणी शेतकऱ्यांसाठी असलेला प्रकल्प आज शेवटच्या टोकाला पाणी आज मासोला, पेडगाव, गणेशपूर, पोघात या गावांना मिळत नाही. त्या गावांना आज टेल टू हेड पर्यंत सर्व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे.

३) सोनल प्रकल्प गाळमुक्त करणे.

४) वाशिम जिल्हा नदी जोड प्रकल्पात बसविण्यात आल्या कारणाने त्या नदीजोड प्रकल्पात आपल्या परिसरिसराचा समावेश करून सर्वेक्षण करायत यावे व त्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा.

५) राज्य शासनाने समृद्धी महामार्ग या परिसरातून नेतांना शेतकऱ्यांना पांदण रस्ते देण्याचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करणे बाबत.

६) परिसरातील सर्वच गावातील शेत रस्ते- पांदण रस्ते पूर्णत्वास नेणे बाबत

७) सोनल प्रकल्पाचे पाणी रब्बी पिकासाठी आक्टोबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात सोडण्यात यावे व

 

 

 

कालव्याची दुरुस्ती तातडीने करावी.आपल्या हक्काच पाणी आणि सुचवलेल्या मागण्यासाठी सर्वानी यावे.या जनआंदोलना बाबत आपण सर्व नियोजना करिता दिनांक १९/१०/२०२४ रोजी शनिवारला दुपारी १ वा. श्री साई श्रद्धा संस्थान शेलूबाजार ता मंगरूळपीर येथे सर्वांनी उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजक-सोनल सिंचन प्रकल्प बचाव शेतकरी जनआंदोलन कृती समिती यांनी केले आहे.