वाशीम : हनुमानजी बोरकर केंद्रप्रमुख यांचा जाहीर सेवापुर्ती सोहळा संपन्न.

 

 

वाशीम

 

 

 

वाशीम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील रिठद

 

 

वाशीम : रिठद केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख ‘श्री. हनुमानजी बोरकर’ यांचा दि.२५ आक्टो. २०२४ रोजी नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाल्याने सेवापूर्ती सोहळा रिठद केंद्राच्या वतीने भावपूर्ण दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर मान्यवराचा सत्कार करून श्री हनुमानजी बोरकर व त्यांच्या पत्नी कांताबाई बोरकर संपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला. बोरकर सर हे शिस्तबद्ध ध्यानी झपाटलेली कमाप्रतीनिष्ठ असणारे विद्यार्थ्या असणारे व आपल्या विचारावर ठाम राहून आपले ध्येय साध्य करून घेणारे शिस्तप्रिय व्यक्तिमत्व वक्तशीरपणा, लोकांच्या सुखदुखात सदैव धावून जाणारे, शिस्तबद्ध नियमाची काटकरपणे अंमलबजावणी करणारे , उत्कृष्ट प्रशासक यांचा भावपूर्ण उल्लेख मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केले.

 

 

या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री भांनुदासजी आरु सेवानिवृत्त शिक्षक , काशीरावजी नायक सेवानिवृत्ती शिक्षक ,भिसडे सेवानिवृत्त शिक्षक, शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य घुगे सर, पंचायत समिती रिसोड गटशिक्षणाधिकारी श्री कोकाटे साहेब, श्री सुदाम खंडारे सर सेवानिवृत्त प्राचार्य, शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तराव ईडोळे उपाध्यक्ष विजय मनवर सर्व संचालक प्रशांत वाझुळकर जगन्नाथ आरु ,रा.सू .इंगळे, संतोष बांडे, अजय कटके त्याचप्रमाणे मंचकराव तायडे, सतीश घुगे, सतीश सांगळे, केंद्रातील जिल्हा परिषद व खाजगी शाळेचे सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य सर्व शिक्षक व गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रिठद केंद्रातील शिक्षक वृंद मुख्याध्यापक दादारावजी शिंदे,शंकर बोरकर, अनिल आरू, संतोष बोरकर, संतोष आरु,रामभाऊ आरू दिलीप बोरकर, किसन माळेकर व सर्व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे संचालन ज्ञानबा आरू व शंकर बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रामभाऊ आरु सर यांनी केले.