
वाशिम जिल्हा प्रतिनिधी /नारायणराव आरु पाटील
वाशिम ते रिसोड राज्यमार्ग क्रमांक ५१ या रस्त्यावर श्री संत गजानन महाराज मंदिरासमोर दि.१९/१०/२०२४ रोजी दुपारी २.३० मी. रिठद गावातील महिला गं.भा.शांताबाई कांबळे (वय वर्ष ६०)या विधवा महिलेला वाशिम कडून येणाऱ्या मोटरसायकल स्वराने वाशिम कुणीकडे व रिसोड कुणीकडे? असा प्रश्न केल्याने त्या बाबीचे उत्तर या महिलेने दिले. व त्याचवेळी अचानक गं.भा.शांताबाई सावळे (वय वर्ष ६०) मंदिरासमोरील ओट्यावर उभी होती त्यावेळी तिच्या गळ्यातील मंगळसूत्राची पोथ गाडीवर बसलेल्या दोन व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने हाताने ओढून तोडली व गाडी रिसोडकडे तुफान वेगाने गेली असल्याचे समजते.
एवढ्या गजबजलेल्या रिठद बस स्थानकावर अशी घटना प्रथमता घडली. या बाबीचा तपास व्हायला हवा याबाबत वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनने चौकशी करून या विधवा महिलेला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी बस स्थानकावर असलेल्या नागरिकांनी व या महिलेने सुद्धा केली आहे. या गरीब महिलेच्या गळ्यातील पोथ चोरी गेल्याचे दुःख शेजारी व गावातील महिलेला झाले त्यामुळे महिला व्यथीत झाल्या होत्या.