
वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
वाशीम : वाशिम जिल्ह्यातील राजकारणाला निवडणूक सुरू होण्यापासून आज अर्ज भरण्याची तारीख सुद्धा जवळ आली आहे दरम्यान सर्वच पक्षांमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही, कोण कुठे जाईल हेही सांगता येत नाही, त्याच पद्धतीने आज दिनांक २०आक्टो. ला डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश घेतला त्यामुळे इतर पक्षातील अनेक इच्छुक उमेदवाराचे धाबे दणाणले आहेत. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले ‘डॉ. सिद्धार्थ देवळे’ हे अगोदर वंचित बहुजन आघाडी मध्ये पश्चिम विदर्भाचे प्रमुख होते दरम्यान त्यांनी राजीनामा दिला व त्यानंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार होते परंतु पक्षप्रवेश लाबंणीवर पडल्याने शेवटी त्या प्रवेशाला मुहूर्त सापडला.
वाशिम जिल्ह्यातील सह संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख ,जिल्हा संघटक, वाशिम -यवतमाळ लोकसभा समन्वयक व जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते व आजी-माजी पदाधिकारी डॉ.सिद्धार्थ देवळे सोबत मातोश्री येथे पोहोचून त्यांचा प्रवेश खासदार अरविंद सावंत,संजय देशमुख , यांचे उपस्थितीत व पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे हस्ते शिवबंधन बांधून त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे विरोधकाची धाक-धुक वाढली आहे. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात डॉ.सिद्धार्थ देवळे आल्याने शिवसेना पक्षाची ताकद सुद्धा वाढणार आहे.असे जनतेमध्ये बोलल्या जाते.