वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील
वाशीम : सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार सध्याच्या काळात एकीकडे नोकरी मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जात आहे. तर वेळप्रसंगी लाखमोलाची जमिनही सुटाबुटात राहून कमी कष्टात जास्त पैसा कमाविण्याच्या हव्यासापोटी विकल्याचे प्रकार ही डोळ्यासमोर आहेत. असे असताना एका ध्येयवेड्या अभियंत्यांनी चक्क पैसा अन् प्रतिष्ठेची नोकरी सोडून ‘सेंद्रीय शेतीत’ पाऊल टाकले आहे. शेती करताना रासायनिक नव्हे तर ऑरगेनिक शेतीची कास धरून अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
मनिष देशमुख असे या जीगरबाज अभियंत्याचे नाव असून ऑरगेनिक शेतीच्या माध्यमातून उद्योग जगतात भविष्याची बाजी लावत शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील लाखाळा परिसरात वास्तव्यास असलेल्या मनिष देशमुखने स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केले़ यानंतर जिल्हा परिषदेत अनेक वर्षे सेवा दिली़ शालेय जीवनापासूनच शेतीची आवड स्वस्थ बसू देत नसल्याने स्वेच्छानिवृत्ती घेवून शेतीकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला़ मात्र, पारंपारिक शेतीपासून शाश्वत उत्पादन मिळू शकत नसल्याची बाब लक्षात आल्याने त्यांनी गौपालनाचा जोडधंदा करण्याचा निर्णय घेतला़ गाईचे शेण व गौमुत्राचा वापर शेतीत करण्यास सुरुवात केली.
आणि शेतीला अच्छे दिन आले तर गाईचे दुध व तूप विक्रीच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या हाताला काम मिळवून दिले़ दरम्यान, मागणी वाढू लागल्याने शहरात गाईचे दुध व तूपाची विक्रीसाठी दुध डेअरी उभी केली़ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खात्रीलायक गाई दुध व शुध्द याशिवाय गाईच्या शेणापासून त्यांनी निर्माण केलेली पर्यावरण पूरक गणपती मूर्तीला देखील प्रचंड मागणी वाढली आहे़ एकूणच स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर शासकीय नोकरी सोडून शेतात रमणार्या मनिषची जिद्द व मेहनतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे़.
शेतीची पोत कायम राखण्यास नक्कीच मदत शेतीपासून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी रासायनिक औषधी व खतांचा भडीमार केल्या जात असल्याचे दिसून येते़ मात्र, उच्च विद्याविभुषित प्रयोगशिल शेतकरी सेंद्रीय शेतीचा निर्णय घेत गौपालन सुरु केले़ तर गाईचे दुध व शुध्द तूप विक्रीचा व्यवसाय उभा करुन अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला़ शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पादन घेणे शक्य असल्याचे दाखविणाऱ्या मनिष देशमुख यांचा आदर्श घेतल्यास शेतीची पोत कायम राखण्यास नक्कीच मदत होईल व शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील़ असा विश्वास गौपालनाच्या व्यवसायाला भेट देणारे शेतकरी व्यक्त करतात़. शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षणाचा उपयोग करावा.
शेतकर्यांनी मुलांनी नक्की शिक्षण घेऊन मोठे व्हावे, त्याचबरोबरच आपल्या शिक्षणाचा उपयोग वडिलोपार्जित असलेल्या शेती व्यवसायात उत्पन्न वाढीसाठी करावा, शिक्षण घेतलेल्या व्यक्तीकडून नुकसान कमी होते तर, फायदा जास्त होतो. शिक्षणचा उपयोग शेती व्यवसायासाठी होण्याची गरज आहे.अशी प्रतिक्रिया मनिष देशमुख यांनी व्यक्त केली.वसुबारस या सणाच्या दिवशी आपण देशी गोवंशाची पुजा करून गोमातेला गुळाची पोळी नैवेद्य म्हणून देतो व तिच्या प्रति कृतघ्नता व्यक्त करतो. आयुष्यभर पौष्टिक दूध,ताक दही, लोणी, तुप इत्यादी पदार्थ अविरतपणे देत असते. वसुबारस सणाच्या निमित्ताने देशी गाईच्या पंचगव्यापासून बनवलेल्या पणत्या, धूप,देशी गायीचे तूप, पंचगव्याची बनवलेली साबण, दंतमंजन अनेक प्रकारच्या वस्तू करून देशी गायीचे महत्व वाठविण्याचे कामही केल्या जात आहे.