पत्रकार शिवाजी खडसे यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा; तालुका मराठी पत्रकार परिषदेचे निवेदन.

 

 

नारायणराव आरु पाटील/वाशिम जिल्हा प्रतिनिधी

मालेगाव : – तालुका मराठी पत्रकार परिषदेचे सचिव शिवाजी खडसे यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी मालेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदेचे वतीने निवेदन दिनांक 19 सप्टेंबर रोजी ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पत्रकार शिवाजी खडसे दिनांक 18 सप्टेंबर रोजी श्री गणपती विसर्जन मिरवणुकीची बातमी घेण्यासाठी जात असताना जुने बस स्थानक परिसरात 4 ते 5 जणांनी मारहाण केली.

 

 

 

त्यांनी याबाबत मालेगाव पोलिसात फिर्याद दिली होती त्यानुसार संबंधित आरोपीविरुद्ध कारवाई करण्याची
मागणी निवेदनात करण्यात आले आहे. निवेदन देते वेळी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा. अरविंद गाभणे, माजी तालुका अध्यक्ष प्रशांत लोखंडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य किरण पखाले, यशवंत हिवराळे, चंद्रकांत गायकवाड, विठ्ठल भागवत,इमरान खान,व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा अध्यक्ष भागवत मापारी, जावेद भवानीवाले, दिपक सारडा, सुभाष बळी, गोरखनाथ भागवत, अजिंक्य मेडशीकर, सय्यद इम्रान, संतोष पवार, विठ्ठल केळे, शेख अनिस बागवान आदी पत्रकारांची उपस्थित होते.