washim : वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेला खिंडार ; मो.युसूफ पुंजानी यांची वंचित बहुजन आघाडीमध्ये धमाकेदार एन्ट्री 

 

 

washim

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील

 

 

 

washim : वाशिम जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी vanchit bahujan aghadi  बहरलेली असताना गेल्या काही दिवसापासून यामध्ये अधिकच भर पडत असल्याचे स्पस्ट होत आहे. काल दिनांक 22 ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यातील अग्रगण्य असलेले पुरवश्रित भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष युसूफ शेठ पुंजानी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष किरणताई गिऱ्हे kiran tai girhe यांची भेट घेऊन यापुढे आपण वंचित बहुजन आघाडी vanchit bahujan aghadi सोबत काम करणार असल्याचे स्पस्ट केले.

 

 

 

मो. युसूफ पुंजानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावार विश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाडी मध्ये काम करण्याचा मानस बोलून दाखविला. यावेळी जिल्हाध्यक्ष किरणताई गिऱ्हे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई इंगळे, रिसोड विधानसभा समन्वयक पारितोष इंगोले, मा. जिल्हामहासचिव सोनाजी इंगळे, वाशिम विधानसभेच्या उमेदवार मेघाताई डोंगरे, रिसोड विधानसभा उमेदवार प्रा प्रशांत गोळे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाऊ उके, वाशिम शहर अध्यक्ष सागर इंगळे, युवा आघाडीचे नागसेन पट्टेबहादूर, प्रा ढेरे सर, गोरखनाथ, रवी पट्टेबहादूर, नगर सेवक जाकिर शेख, शंकर कटके, शेषराव चव्हाण, देवरा कटके, रितेश खोबरागड़े, विलास डोंगरे, संजय खाडे सर, मोनू सुरवाडे, यांचेसह बहुसंख्य पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.