वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
washim : आसेगाव तालुका ‘मंगरूळपीर’ येथील शाळेत जाण्याच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे समस्या निर्माण शाळेकडून अनेकवेळा दिलेल्या तक्रारीची दाखल घेतलीच नाही मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद विद्यालयातील २०० विध्यार्थ्यांना मागील दोन वर्षा पासून दररोज चिखलातूनच शाळेत प्रवेश करावा लागतो यासाठी तक्रारी अनेक वेळा वरिष्ठाकडे देऊनही याची दखल घेतली गेल्या नसल्याने आजही शाळेतील विध्यार्थींना चिखलातून जावे लागत आहे.
शाळेतील मुख्याध्यापिका यांनी ता २१ आक्टोबर रोज़ी तहसीलदार मंगरुळपीर यांचे कडे तक्रार देऊन समस्या निकाली लावण्याची विनंती केली आहेत. मुखयाध्यापिका मौलाना अब्दुल कलाम आझाद विद्यालय यांनी तहसीलदार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि मागील दोन वर्षा आधी संबधित आसेगाव ग्रामपंचायत अंतर्गत यांनी या रस्त्याचे काम केले मात्र हे काम पूर्ण न करता अर्धवट सोडून दिले व ज्या भागाचे काम अपूर्ण राहिले त्या भागामध्ये त्या परिसरातील घराचे व नालीचे पाणी रस्त्यावर येते. लोकांनी या दरम्यान काही लोकांनी अतिक्रमण सुद्धा केलेले आहे.
तर या ठिकाणी गटाराचे स्वरूप निर्माण झाले आहेत व त्या गटारातून दररोज विध्यार्थ्यांना कसरत करून यावे जावे लागते तरी याबाबतची तक्रार संबंधित विभागाकडे केली होती पण दखल घेतली नाही, उलट संबंधित ठेकेदाराना पूर्ण कामाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहेत तरी पुन्हा या प्रकारची तक्रार वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन या चिमुकल्याची साठी समस्या निकाली काढतील का ? असा प्रशन निर्माण झाला आहेत.