“रक्तदान म्हणजे जीवनदान” वाढदिवसाच्या औचित्य साधून रक्तदान शिबिर.

 

नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी 

 

शेलगाव राजगुरे येथील तरुण शिवम वाघ यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदानाचे आयोजन केले होते शिवम हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कार्यकर्ता असून गरजवंतांना रक्ताची उनीव भासू नये. रक्तदान म्हणजे जीवनदान” वाढदिवसाच्या औचित्य साधून रक्तदान शिबिर कोणताही व्यक्ती कोणत्याही जातीचा,धर्माचा अपघातात जखमी झाल्यास रक्ताची गरज पडल्यास अशा गरजवंतांना हे रक्त मिळावे हा मूळ उद्देश असून या रक्त वेळेवर आणी वेळेतच मिळायला हवे आणी त्याचा जीव कसा वाचेल यासाठी रक्तदानाचे आयोजन (blood donate) केले होते.

 

 

 

या शिबिरामध्ये ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्त संकलन करण्यासाठी जय गजानन रक्तपेढी वाशिम यांनी यासाठी सहकार्य केले.यासाठी गोवर्धन सर्कल मधील कार्यर्कर्ते व पदाधिकारी यांनी शिवम वाघ यांच्या वाढदिवसा निमीत्त सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती रिसोड-मालेगावचे आमदार मा.श्री अमितभाऊ झनक मा.ओम झनक, जि.प.सभापती मा.वैभव सरनाईक, पं.स. सदस्य राहुल बोडखे, मा.सचिन इप्पर सह समस्त शिवम वाघ यांच्यावर प्रेम करणारे मित्र मंडळ, परीवार व गावकरी मंडळी उपस्थित होती.