वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
washim : रिसोड तालुक्यातील किनखेडा kinkheda येथील शेतकरी जनार्दन आवचार यांचा गोठा विद्युत वितरणच्या पोलजवळ असल्याने व पावसाळा असल्याने गोठ्याचे टिनपत्राला व पोलच्या तणाव्याला विद्युत करंट वाहू लागल्याचे कळाले नसल्याने शेतकरी जनार्दन आवचार यांनी २७ सष्टे.रोजी आपली बैलगाडी गोठ्यासमोर सोडल्यावर व बैल खुट्याला बांधल्यानंतर चारा टाकला यामध्ये एका बैलाला विद्युत करंट लागून जागीच मृत्यू झाल्याने शेतकरी जनार्दन आवचार यांनी धिर सोडला.कारण तोंडावर रब्बी हंगाम सुरू होणार असल्याने बैलांचे अपघाती नुकसान झाले.तरी प्रशासनाने आर्थिक मदत करावी आणी विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षित कामामुळे हा अपघात घडला असावा अशी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा होती.याबात ‘महावितरणच्या’ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी.अशी मागणी शेतकरी जनार्दन आवचार यांनी बोलतांना केली आहे.