
प्रतिनिधी/ किशन काळे रिसोड
वाशिम (washim) जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे येथे स्वाती सुभाष गायकवाड वय वर्ष 17 अल्पवयीन मुलींनी स्वतःच्या राहत्या घरामध्ये दिनांक 27 सप्टेंबर 2024 सकाळी दहा वाजता ही घटना घडली आहे आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गोहगाव हाडे येथील स्वाती सुभाष गायकवाड हिने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वाती गायकवाड आपल्या आजीसह एकटीच घरी रहात असून वाकद येथील शिवाजी हायस्कूल महाविद्यालयात इयत्ता बारावीचे शिक्षण घेत होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन रिसोड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गीते आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा केला आत्महत्या करण्याचे कारण अद्याप तरी समजू शकले नाही. प्रेत तपासणीसाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे .पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गीते एस आय वसंत तहकीक ,गणेश हाके रिसोड पोलीस तपास करीत आहेत.