नारायणराव आरु पाटील/प्रतिनिधी
रिसोड तालुक्यातील मोठेगांव व परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे खुप मोठ्याप्रमानात नुकसान झाले.रिसोड तालुक्यातील भर जहाँगीर महसुली मंडळमध्ये येणाऱ्या मोठेगांव व परिसरातील गणेशपुर,एकलापुर,सरपखेड या शिवारामध्ये दिनांक ३० ,३१ आॅगस्ट व १,२ सप्टेबर या दरम्यान खुप मोठ्या प्रमानात अतिवृष्टी झाली, असुन या भागातील प्रमुख पिक असलेल्या सोयाबिन पिकांचे खुप मोठ्या प्रमानात नुकसान झाले,पाणी साचुन राहील्याने पीकाच्या मुळ्या सडत आहेत. त्या बरोबर ईतरही पिकाचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले आहे.
या वर्षी अत्यंत बहरलेले सोयाबिन पिक होते परन्तु अगदी हाता तोंडाशी आलेला घास परिसरातील शेतकऱ्याच्या तोंडातून हिरावून गेला असल्याचे चित्र निर्माण झाले. सोयाबिन पिक अक्षरशः पावसामुळे आडवे पडत आहे. त्यामुळे त्याच्यावर खुप मोठे संकट निर्मान झाले असुन शेतकऱ्याचे झालेले नुकसान लक्षात घेता प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पिकाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज देशमुख यांची केली आहे.