
नारायणराव आरु पाटील/ प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रभर गाजलेल्या या योजनेला महाराष्ट्र सरकार मूर्त रूप देण्याच्या मानसिकतेत आहे. व लोकोपयोगी व कुटुंबात या योजनेचे पैसे कामी येण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना जाहीर केली, परंतु काही बँका मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे पैसे त्या महिलेने किंवा पतीने अथवा कुटुंबातील व्यक्तीने कर्ज घेतलेल्या खात्यात वर्ग करत आहेत.
परंतू महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या १९ आॅगष्ट च्या आदेशान्वये कोणत्याही (दि.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळून)बॅंकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्याही कर्जांच्या पोटी वर्ग करु नये.ते महीलांना खात्यात जमा झाल्यावर ज्यावेळी ती महीला खातेदार पैसे काढण्यासाठी बॅंकेत येईल त्यावेळी कोणतीही पैसे द्यावे.असे शासनाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.NPA खाते केले असल्यास ते खाते तात्काळ चालू करावे.असेही आदेशात म्हटले आहे.याबाबत बॅक व्यवस्थापकांनी या बाबींची दखल घ्यावी .