रिठद येथे जय जगदंबा दुर्गा नवरात्रोत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन.

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील

 

रिसोड तालुक्यातील रिठद येथील जय जगदंबा दुर्गा उत्सव मंडळ रिठद यांच्या मंडळाने दि.६/१०/२०२४ रोजी सायंकाळी ७ वा सामाजिक कार्यकर्ते नारायण आरु यांना आरती करण्याचा मान देऊन यांचे हस्ते आरती केली.व आरती झाल्यावर मंडळाची सामाजिक बांधिलकी म्हणून नवदुर्गेच्या आरतीसाठी उपस्थित असणाऱ्या महिलामधून दररोजची सायंकाळची आरती झाल्यावर लकी ड्रॉ काढण्यात येतो.या ड्रा मध्ये आरतीसाठी उपस्थित महिलांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात येतात तर लहान मुलांचे हाताने चिठ्ठी काढून ज्यांचे नाव निघेल त्या महिलेला साडी भेट दिली जाते.त्या प्रमाणे आज संगीता संदीप आरु या नावाची चिठ्ठी निघाली व साडी भेट सौ.शारदा संतोष आरु या महिलेच्या हस्ते देण्यात आली या उपक्रमाबद्दल भक्तगण आनंदी आहेत.

 

 

 

मंडळाचे कौतुकही करण्यात येऊन स्तुस्ती सुद्धा नागरिक करत आहेत दरम्यान आज सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सामाजिक उपक्रमाचा ध्यास घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.दरम्यान २० रक्ततदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला. व रक्तदात्यांना शेवटी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.श्री गजानन ब्लड कम्पोनंट अफेरिसीस सेंटरचे मोहन गायकवाड (ब्लड बँक अध्यक्ष),व सहकारी विष्णू शिकारे, शुभम काटे, डॉ. तृप्ती शेळके, प्रणिता कदम, सुजाता खंडारे हि सर्व मंडळी यावेळी रक्तपेढीच्या माध्यमातून रक्त संकलित करण्यासाठी उपस्थित होती. यावेळी मंडळाचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते या सामाजिक कार्यासाठी सर्वांनी मदत केली.