हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सामाजिक कार्याचे सुवर्णफळ! पत्रकार सुनिल अंभोरे यांना ‘संत गाडगेबाबा समाज रत्न’ पुरस्कार

On: January 6, 2026 9:02 AM
Follow Us:
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुनिल अंभोरे यांना संत गाडगेबाबा समाज रत्न पुरस्कार प्रदान

सिंदखेडराजा/समाधान सरकटे 

समाजासाठी केलेल्या कार्याचे सुवर्णफळ म्हणून
सुनिल अंभोरे यांना समाज रत्न पुरस्कार हा सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
राज्यस्तरीय सोहळ्यात पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे
सुनिल अंभोरे हे समाज रत्न पुरस्कार स्वीकारताना भावूक झाले.
सामाजिक बांधिलकी, अंधश्रद्धेविरोधातील लढा आणि पत्रकारितेतील प्रामाणिकपणा यासाठी
 देण्यात आला.
या गौरवामुळे समाज रत्न पुरस्कार हा सामाजिक कार्याचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे ‘दैनिक भारत संग्राम’च्या वतीने स्वर्गीय मधुकरराव खंडारे यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व समाजभूषण अर्जुनराव गवई यांच्या वाढदिवसानिमित्त
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या भव्य सोहळ्यात पत्रकार सुनिल अंभोरे यांना मानाचा समजला जाणारा
‘संत गाडगेबाबा समाज रत्न’ पुरस्कार एच.डी.ओ. प्रा. संजय खडसे,
मुख्य आयोजक पत्रकार सचिन खंडारे, कवी विकास सुखदाने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

विशेष म्हणजे, सुनिल अंभोरे यांनी आपला ५४ वा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करून
अंधश्रद्धेविरोधात समाजप्रबोधनाचा वेगळा संदेश दिला होता.
त्यांच्या या कृतीने समाजात मोठी चर्चा निर्माण झाली होती.

कार्यक्रमाला धम्मगुरू भंतेजी, रविकांत तुपकर, योगेश जाधव, गजानन करेवाड,
अर्जुनराव गवई, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,
ज्येष्ठ पत्रकार व हजारो नागरिक उपस्थित होते.

हे पण वाचा..

करडी पुलावर मृत्यूचा तांडव! एसटी बसखाली ट्रिपल सीट दुचाकी चिरडली; तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

या पुरस्कारामुळे सुनिल अंभोरे यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील कार्याला
नवीन ऊर्जा मिळाली असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


📌 Kattanews.in – तुमचा विश्वासार्ह आवाज

अशाच सकारात्मक, प्रेरणादायी व समाजोपयोगी बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी
Kattanews.in ला दररोज भेट द्या.


🔗 Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतरची माहिती

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बळजबरीच्या धर्मांतरावर 7 वर्षांपर्यंत शिक्षा, जाणून घ्या काय आहेत नव्या तरतुदी

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

Leave a Comment