दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

सुनगावात धक्कादायक घटना: 29 वर्षीय गणेश मिरटकर आत्महत्या; मानसिक छळामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय

On: February 22, 2026 8:57 AM
Follow Us:
https://kattanews.in/shivjayanti-gunj-clash-dj-dispute-19-accused/

सुनगाव | २२ फेब्रुवारी २०२६

सुनगाव आत्महत्या प्रकरणाने परिसर हादरला असून 29 वर्षीय गणेश मिरटकर या ग्रामपंचायत सफाई कामगाराने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना 19 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. गणेश मिरटकर आत्महत्या प्रकरणात मानसिक छळ आणि धमक्यांमुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील वाढत्या मानसिक तणावाच्या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मिरटकर यांनी आपल्या राहत्या घराशेजारील बकरीच्या शेडमध्ये मोटरसायकलच्या लोखंडी वायरच्या साहाय्याने गळफास घेतला. दुपारच्या सुमारास ही बाब समोर आली आणि परिसरात खळबळ उडाली.

मृतकाच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत सोन्याच्या वाटपावरून आरोपी रवि नारायण धुळे हा सतत धमक्या देत असल्याचा आरोप केला आहे. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून गणेश यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108 व 351(2) अन्वये संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे पुढील तपास करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सुनगाव परिसरात शोककळा पसरली आहे.


हे पण वाचा..


👉 आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी नियमित भेट द्या — Kattanews.in

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखलीतील तलाठी पियुष गायकवाड यांच्या आत्महत्येची बातमी

अवघ्या २६ व्या वर्षी जीवनप्रवास थांबला; चिखलीतील तरुण तलाठी पियुष गायकवाड यांची आत्महत्या

बुलढाणा जिल्हा परिषद लाचप्रकरण ACB कारवाई

बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ आणि अंढेरा परिसरातील धरणांवरील पाणी उपशाच्या तपासणीची मागणी

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ, अंढेरा परिसरातील धरणांवर पाणी उपशाचे नियंत्रण कोण ठेवणार? भरारी पथकाच्या तपासणीची मागणी

शिंदी सरकारी एफ-क्लास जमीन प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिंदी सरकारी जमीन प्रकरणात मोठी घडामोड! तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

देऊळगाव राजा बालाजी महाराज मंदिरात मंगळसूत्र चोरीची घटना

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

साखरखेर्डा महिलेवर हल्ला करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडले

साखरखेर्ड्यात भरदिवसा महिलेच्या घरात घुसून गळा दाबण्याचा प्रयत्न; आरडाओरड ऐकून नागरिकांनी आरोपीला पकडले

Leave a comment