सुमित खंदारे |मेहकर
समाजसेवा म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही तर मनापासून केलेली भावना याचं उत्तम उदाहरण हिंगोलीतील समाजसेवक तथा कामगार नेते सुमित रामकिसन खंडारे यांनी घालून दिलं आहे. त्यांनी आपल्या मुलगी स्वरा श्वेता सुमित खंडारे हिचा चौथा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
इतरत्र खर्च न करता त्यांनी मुलीचा वाढदिवस हिंगोली येथील सेवासदन वसतिगृहात, अनाथ मुलांसोबत अन्नदान करून साजरा केला. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
हेही वाचा.
भाजपाला कुबड्यांची गरज नाही” – Amit Shah On Mahayuti | महाराष्ट्रात BJP चा पॉवरफुल इशारा!
सुमित खंडारे यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस अनाथाश्रमात, दुसरा मूकबधीर व मतीमंद मुलांसोबत आणि तिसरा अंध मुलांच्या शाळेत साजरा केला होता.ही परंपरा पुढे चालवत, चौथ्या वाढदिवसाचं आयोजन सेवासदन वसतिगृहात करण्यात आलं. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अन्नदान केलं आणि सर्वांसोबत आनंद साजरा केला.
समाजरत्न, समाजभूषण आणि आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्काराने सन्मानित सुमित रामकिसन खंडारे यांनी सांगितले की, “आपण आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण समाजातील गरजूंसोबत वाटले पाहिजेत. त्यातून खरी समाधानाची अनुभूती मिळते.”
त्यांच्या या उपक्रमामुळे समाजात एक सकारात्मक व प्रेरणादायी संदेश गेला आहे.
या कार्यक्रमाला निवृत्ती सरकटे, दीपक सरकटे, रामकिसन खंडारे, आशा खंडारे, महेंद्र दवंडे, सिद्धार्थ दवंडे, स्वाती इंगोले, अविनाश इंगोले यांच्यासह अनेक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.सुत्रसंचालन करण राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन अविनाश इंगोले यांनी केले.










