suicide news : माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे. माझी शेवटची इच्छा म्हणून, कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाइकांची, माझ्या रूममेटची, मी राहत असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही कोणतीही चौकशी करू नका,’ असा स्टेटस ठेवत रत्नागिरीतील भाट्ये पुलावरून उडी मारून वकिलाने आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. ‘अॅड. सौरभ श्रीकृष्ण सोहनी’ adv. saurabh shrikrusna sohni न उडी मारून वकिलाने आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.
आत्महत्येचे suicide कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अॅड. सौरभ सोहनी adv. saurabh shrikrusna sohni हे मूळचे राजापुरातील rajapur रहिवासी असून, ते रत्नागिरीत गेल्या ९ वर्षांपासून वकिली करीत होते. आपल्या मित्रासोबत रत्नागिरी ratnagiri शहरातील थिबा पॅलेस येथ भाड्याने राहत होते. सोमवारी रात्री ९ ते ९:३० वाजण्याच्या दरम्यान मित्राची गाडी घेऊन जेवायला जातो, असे सांगून ते खोलीमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट भाट्ये पूल गाठला. भाट्ये पुलावर आल्यानंतर ‘आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका,’ अशा आशयाचे स्टेटस ठेवून त्यांनी समुद्रातउडी मारली. मंगळवारी सकाळी अॅड. सौरभ सोहनी यांचा मृतदेह रत्नागिरी शहरातील खडपेवठार समुद्रकिनारी तरंगताना आढळला.