रामदास कहाळे/सिंदखेडराजा (शहर प्रतिनिधी)
शिक्षणाशिवाय पर्याय नाही ज्यांनी ज्यांनी शिक्षण घेतलं शिक्षणाची तपश्चर्य पूर्ण केली वाचन आणि पुस्तकापासून दूर गेली नाही ते आज पर्यंत मोठ्या पदावर गेली आहेत म्हणून विद्यार्थ्यांनो शिक्षणाचा ध्यास व कास सोडू नका शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातून परिपूर्ण शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावेत असे आव्हान सेवानिवृत्त मंत्रालय सचिव सिद्धार्थ खरात यांनी उत्कर्ष महाविद्यालयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त बोलतानी केले.
मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील उत्कर्ष कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये 15 ऑगस्ट स्वतंत्र्या दिनानिमित्त सकाळी 10 वाजता ध्वजारोहण सुधीर गव्हाणे माजी कुलगुरू यांच्या हस्ते करण्यात आले. उत्कर्ष कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पाचव्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षी प्रसिद्ध उत्कर्ष साहित्यरत्न पुरस्कार साहित्यिक क्षेत्रात विविध विषयाला स्पर्श करून मुनादी काव्यसंग्रह प्रसिद्धी करून राज्याला वेगळी ओळख निर्माण करून देणारे प्रसिद्ध साहित्यिक मांगीलाल राठोड, यांना उत्कर्ष साहित्य रत्न, तर कोरोना काळात ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना मोफत व उत्कृष्ट शिक्षण देणाऱ्या गोदावरीताई तांबेकर यांना उत्कर्ष शिक्षक रत्न पुरस्कार देऊन यावेळी गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ खरात अध्यक्ष उत्कर्ष फाउंडेशन तथा सचिव मंत्रालय मुंबई तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी कुलगुरू सुधीर गव्हाणे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे गोंविंद गोंडे पाटील-अध्यक्ष अंकुर शिक्षण संस्था , प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख छगनराव मेहत्रे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस विजय तायडे राजे लखोजीराव जाधव संस्थेचे अध्यक्ष शिवाजी राजेजाधव डॉ.रांची सिद्धार्थ खरात ( एमडी के एम रुग्णालय मुंबई)
उत्कर्ष फाउंडेशनचे सचिव भास्कर गवई कोषाध्यक्ष गंगाधर खरात संचालक प्रवीण गीते विठ्ठल चव्हाण,प्रदिप बिल्होरे, पत्रकार रामदास काळे पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती उत्कर्ष महाविद्यालया मध्ये स्वातंत्र्यंदिन , उत्कर्ष पुरस्कार व महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्ताने या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य उत्तम अंभोरे सर यांनी तर सूत्रसंचालन प्रा प्रा.स्नेहांकिता पुंडकर ( तायडे) व आभार संस्थेचे सचिव प्राचार्य सुनिल सुरूळे, विरेंद्र तायडे यांनी केले आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहेत या स्पर्धेत आपल्याला टिकायचा असेल मोठ व्हायचं असेल स्पर्धेत टिकायचं असेल तर मला माझ्या मध्ये क्षमता निर्माण करावी लागेल म्हणून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षमता निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी केले
उत्कर्ष फाउंडेशन तथा उत्कर्ष कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार वितरित करण्यात आले त्यामध्ये पुरस्कार प्रख्यात साहित्यिक विचारवंत मांगीलाल राठोड यांना उत्कृष्ट साहित्यरत्न पुरस्कार,तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राहिली येथील गोदावरी तांबेकर (झोरे)यांना उत्कर्ष शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला