
buldhana : रविवारी बिबट्याच्या हल्ल्यात दोनजण जखमी झाल्याची घटना रोहिणखेड rohinkhed शिवारात ६ ऑक्टोबरला घडली. जखमींना जिल्हा रुग्णालय बुलढाणा buldhana येथे हलविण्यात आले. बिबट्यांनी आठवड्याभरात तीन जणांवर हल्ले केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचे गांभीर्य पाहता ८ ऑक्टोबर रोजी वनविभागाने रोहिणखेड rohinkhed शिवारातील पांदण रस्त्यावर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. रोहिणखेड rohinkhed येथील गजानन मारुती सोनोने gajanan maruti sonavane (६०) हे रोहिणखेड rohinkhed येथील बाजारात भाजीपाला विकून दुचाकीने शेताकडे जात असताना त्यांच्यावर ६ ऑक्टोबरच्या सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जुना नाईकनगर juna naiknagar रोडवर बिबट्याने हल्ला केला.
त्यांच्या हातावर व गुडघ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला. या घटनेला अर्धातास उलटत नाही तोच सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रोहिणखेड येथील रोशन विजय सुरपाटणे व मंगेश सुरपाटणे हे उबाळखेड येथून रोहिणखेड येथे जात असताना त्यांच्या दुचाकीवर बिबट्याने झडप घातली. यात रोशन सुरपाटणे (वय ३०) जखमी झाले. दोघांवर रोहिणखेड rohinkhed येथे प्राथमिक उपचार करून खासगी वाहनाने बुलढाणा buldhana जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. १ ऑक्टोबर रोजी शेतकरी गोविंद गुजर (६०) हे शेतात गेले असता त्यांनासुद्धा बिबट्याचे बछडे व बिबट दिसल्याने ते घरी परतले. या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
जेरबंद करण्यासाठी लावला पिंजरा
रोहिणखेड rohinkhed परिसरात बिबट्याचे हल्ले वाढल्याने ८ ऑक्टोबर रोजी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ड्रोन कॅमेऱ्याने रोहिणखेड शिवारातील पांदण रस्त्यावर बिबट्याला पकडण्यासाठी ‘पिंजरा’ लावण्यात आला. यावेळी वनपाल एस. एच. जगताप, वनरक्षक आर.बी. सिरसाट, कैलास तराळ, संतोष जाधव, वैभव कुंड, संजय आमले, श्रीधर राजनकर उपस्थित होते.