
लोणार/प्रतिनिधी
lonar : लोणार lonar तालुक्यातील शारा या गावाजवळील वळण रस्त्यावर सोने व्यापारी आदित्य अजितकुमार संचेती aditya ajitkumar sancheti वय ३५ यांची दुचाकी थांबवून व त्यांना बंदूकीचा धाक दाखवून व मारहाण करून रोख अडीच लाख रुपये व सोन्या चांदीचे दागिने लूटल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान शारा shara या गावाजवळ घडल्याने एकच खळबळ उडाली. लोणार येथील व्यापारी आदित्य संचेती यांचे सुलतानपूर sultanpur येथे दर्शन ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे.
ते लोणार ते सुलतानपूर रोजये-जा करीत असत. दरम्यान नेहमी प्रमाणे ते दुकान बंद करून आपल्या दुचाकी स्कुटी क्र. एम. एच. २८ बीवाय ६३८५ने लोणारकडे निघाले असता लोणार तालुक्यातील शाळा या गावाजवळ असलेल्या वळन रस्त्यावर लोणार lonar वरून दुचाकी वर आलेल्या तिघांनी त्यांना अडवून त्यांना चापट व बुक्क्यांनी ‘मारहाण’ केली. व त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या जवळील रोख दोन लाख रुपये व सोन्याचे दागिने चोरांनी त्यांच्याकडून हिसकावून घेतले.सदर घटनेची माहिती मिळताच उपविभाग पोलीस अधीकारी प्रदीप पाटील, ठाणेदार निमिष मेहत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन सविस्तर घटना जाणून घेतली वृत्त लिहीपर्यंत कुठलीही देण्यात आली नव्हती.