हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडदेऊळगाव राजा : डीपी रोडवरील अतिक्रमणावरून वाiQOO 15 Price in India: जबरदस्त फीचर्ससह लॉन्च, किंमत जाणून आजचे राशिभविष्य (Today Horoscope) 20 नोव्हेंबर 2025 – आपल्यासरपखेड–धोडप बुद्रुक रस्ता 10 वर्षांपासून खड्“भाजपाला कुबड्यांची गरज नाही” – Amit Shah On Mahayuti |

सिंदखेडराजा निवडणूक तापली! चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार ?

On: December 1, 2025 6:45 PM
Follow Us:
"सिंदखेडराजा-देऊळगाव राजा निवडणूक प्रचार तापला आणि चुरशीची लढत रंगली"

सिंदखेडराजा प्रतिनिधी/रामदास कहाळे 

सिंदखेडराजा- हे सध्या संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात चर्चेचे केंद्र बनले आहे. दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकांना फक्त काही दिवस बाकी असताना सिंदखेडराजा-देऊळगाव राजा निवडणूक यामध्ये प्रचाराचा तापमान शिगेला पोहोचले आहे. रॅल्या, सभा, कोपरा सभा, घरदारी संपर्क, मतदारांशी संवाद आणि सोशल मीडिया मोहिमा यांमुळे स्थानिक राजकारणाची धग अधिकच वाढली आहे. अनेक वर्षांनंतर एवढी चुरस दिसत असल्याने ही सिंदखेडराजा-देऊळगाव राजा निवडणूक संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारी ठरण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.सिंदखेडराजा येथे राष्ट्रीय काँग्रेस (अप), भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांच्यात तिढा निर्माण झाला आहे. प्रत्येक पक्ष सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार दिसत आहे. गेल्या कार्यकाळातील विकासकामांवरून एकमेकांवर आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये उमेदवारांची गर्दी वाढली असून नागरिकांशी थेट संवाद साधण्याची स्पर्धा जोरात लागली आहे. काही ठिकाणी तर पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.देऊळगाव राजा येथे परिस्थिती आणखी रंजक आहे. येथे राष्ट्रीय काँग्रेस (अप), भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) एकत्र येत “नगरविकास आघाडी” स्थापन करून मैदानात उतरली आहे. या आघाडीने विकासाचा मुद्दा पुढे करत नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे विरोधकांनी या आघाडीवर ‘स्वार्थासाठी एकत्र आले’ असल्याचा आरोप करीत प्रचार अधिकच तापवला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेमुळे सिंदखेडराजा-देऊळगाव राजा निवडणूक दोन्ही शहरांत प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या सभा हजारोंच्या संख्येने झाल्या असून कार्यकर्ते व मतदार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. अशा मोठ्या सभांमुळे निवडणूक आणखी रंगतदार बनली आहे आणि परिसरातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे.

सिंदखेडराजा-देऊळगाव राजा निवडणूक दोन्ही शहरांतील उमेदवारांनी घराघराचा संपर्क पूर्ण केला असून आता प्रचार रथ, भव्य बॅनर, पोस्टर, कोपरा सभा आणि सोशल मीडिया रील्स यांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचले जात आहे. सर्वच पॅनल आमचे उमेदवारच सक्षम असल्याचा दावा करत मतदारांच्या मनात आपल्या बाजूने छाप निर्माण करण्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहेत.

सिंदखेडराजात शिंदे सेनेपुढे पुन्हा सत्ता मिळवण्याचे आव्हान आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (अप आणि शप) स्वतंत्रपणे लढत असल्याने तिकडे समीकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. दुसरीकडे देऊळगाव राजात ‘युतीची सत्ता राखणे’ हा मुख्य मुद्दा असून भाजप आणि राष्ट्रवादी (अप) ही सत्तेचा गड टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि आमदार मनोज कायंदे हे तिन्ही नेते स्वतः प्रचारात उतरले असल्याने मतदारांच्या मनातील गोंधळ वाढला आहे. कोण कोणाच्या बाजूने आहे आणि कोण कोणासोबत लढत आहे, या जटिल राजकीय समीकरणांमुळे मतदारांमध्ये चर्चा, विश्लेषण आणि कुतूहल वाढले आहे. अनेक मतदारांनी तर उघडपणे ‘प्रचार तापला आहे, पण जिंकणार कोण?’ असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना विशेष महत्त्व मिळत आहे. पाणीपुरवठा, गटारींची दुरुस्ती, आरोग्य सुविधा, बाजारपेठीचा विस्तार, वाहतूक व्यवस्था, रस्त्यांची गुणवत्ता, स्मार्ट सिटीसारखा विकास यांवरून उमेदवारांची परीक्षा घेतली जात आहे. युवकांमध्ये रोजगार, उद्यमशीलता आणि डिजिटल सुविधा यांची मागणी अधिक असल्याने त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा पक्षांचा प्रयत्न सुरू आहे.

सिंदखेडराजा-देऊळगाव राजा निवडणूक सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दोन्ही ठिकाणी ‘प्रतिष्ठेची निवडणूक’ म्हणून या लढतीकडे पाहिले जात आहे. काही मतदारांनी ‘या वेळी विकास करणारा नेता हवा’ अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. दुसरीकडे पक्षनिष्ठा, घराणेशाही मतं, जुनी वैरं आणि जातीय समीकरणेही काही ठिकाणी निर्णायक ठरणार असल्याचे संकेत आहेत.

हे पण वाचा.

साप्ताहिक राशीभविष्य 2025 (Weekly Horoscope) – या आठवड्याचे सर्व राशींचे संपूर्ण भविष्य.

राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की सिंदखेडराजा-देऊळगाव राजा निवडणूक या दोन्ही शहरांतील निवडणूक एकतर्फी जाण्याची शक्यता कमी आहे. बहुतेक सर्व वॉर्डमध्ये तिरंगी किंवा चौकोनी लढती होण्याची शक्यता असून काही ठिकाणी मतविभाजन निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत प्रचारात प्रचंड वेग येईल आणि अनेक मोठ्या बैठकांमुळे पत्ते बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे पण वाचा.

अपघात की घातपात? बेपत्ता दांपत्याची कार बंद विहिरीत – आत मिळाले सडलेले 2 मृतदेह!

आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की अखेर सिंदखेडराजा–देऊळगाव राजा या प्रतिष्ठेच्या नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारते. आमदारांचा प्रभाव टिकतो का? माजी आमदार व माजी मंत्र्यांचे राजकीय वजन वाढते का? की मतदार पूर्णपणे वेगळा कौल देऊन नवे समीकरण तयार करतात? हे सर्व २–३ दिवसांत स्पष्ट होणार आहे.


📌 संबंधित बातम्या


👉 WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

स्थानिक Breaking News, सरकारी योजना आणि राजकीय अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.

Join WhatsApp Group

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!