रिसोड प्रतिनिधी/विजय जुंजारे सरपखेड–धोडप बुद्रुक रस्ता गेल्या दहा वर्षांपासून पूर्णपणे खड्ड्यात असून
सरपखेड–धोडप बुद्रुक रस्ता या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्ण प्रचंड त्रस्त झाले आहेत.सरपखेड–धोडप बुद्रुक रस्ता दुरुस्तीची मागणी वारंवार होत असतानाही
सरपखेड–धोडप बुद्रुक रस्ता सुधारण्याबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नेते मात्र नेहमीप्रमाणे गायब, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उखडलेली माती आणि खोलगट भाग असल्यामुळे दररोजचा प्रवास धोकादायक ठरत आहे.पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर होते. वाहनांचे सतत बिघाड, शेतमाल खराब होणे, रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचता न येणे—या सर्व समस्यांमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.या मार्गावरून शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारात नेतात; परंतु रस्त्याच्या दुरवस्थेमुळे माल खराब होणे आणि वाहनांच्या दुरुस्तीवर अतिरिक्त खर्च होणे हे त्यांचे मोठे नुकसान आहे. “नेते फक्त निवडणुकीच्या वेळी येतात; पण रस्त्याच्या दुरुस्तीकडे कोणीच पाहत नाही,” अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली.आपत्कालीन सेवांनाही या मार्गावर मोठा अडथळा येत आहे.हे पण वाचा.रिसोड बसस्टँडवर ५२०० रुपये चोरी; पोलिसांचा विजेगती तपास — पाकीटमार तासाभरात ताब्यात!रुग्णवाहिका खोल खड्ड्यांमध्ये अडकतात, गर्भवती महिलांना वेळेवर दवाखान्यात पोहोचवणे कठीण होते आणि गंभीर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे मौन अधिकच प्रश्न निर्माण करणारे आहे.
ग्रामस्थांनी अनेक वेळा PWD, पंचायत समिती आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे लेखी मागण्या केल्या; पण दहा वर्षांपासून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. “लवकरात लवकर दुरुस्ती सुरू झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
हे पण वाचा.
२४ तास मद्यधुंद अधिकारी? – वाकद ग्रामपंचायतीचा संताप, M. P. Lonkar यांच्या बदलीची मागणी.
📢 तुमच्या भागातील कोणतीही समस्या, घटना किंवा बातमी आम्हाला पाठवा.
WhatsApp:
क्लिक करा.