साखरखेर्डा (वार्ताहर) |२३ मार्च २०२६
बुलढाणा जिल्ह्यातील गुंज येथे Shiv Jayanti मिरवणुकीदरम्यान DJ वादातून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या Shiv Jayanti violence Buldhana प्रकरणात पोलिसांनी १९ जणांवर गुन्हा दाखल केला असून Gunj village crime news मध्ये तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
१४ फेब्रुवारी रोजी गुंज गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक सुरू असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर यांच्या घरासमोर DJ वाजविण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. काही वेळातच हा वाद हाणामारीत बदलला आणि अनेक जण जखमी झाले.
या घटनेनंतर अनिल तुपकर यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी माजी सभापती सुरेश माधवराव तुपकर यांच्यासह १४ जणांवर मारहाणीचा आरोप केला.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका आरोपीला घटनादिवशीच अटक केली होती, तर इतर आरोपी फरार होते. तपासादरम्यान शाम सुरेश तुपकर, पवन परसराम तायडे आणि अक्षय रामकिशन तुपकर या तिघांना २० मार्च रोजी अटक करण्यात आली.
सुरुवातीला न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर २१ मार्च रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध साखरखेर्डा पोलीस घेत असून लवकरच आणखी अटक होण्याची शक्यता आहे.
👉 अशाच ब्रेकिंग आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या आणि ही बातमी शेअर करा.
संबंधित बातम्या










