रिसोड |४ फेब्रुवारी २०२६
यावेळी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवश्री शिवाजी कवर, सातारकर महाराज संस्थानचे अध्यक्ष देशमुख, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष गजानन खंदारे, रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, शांतता समितीचे अध्यक्ष मंचकराव देशमुख, व्हॉईस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष रुपेश बाजड यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर गायकवाड सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पानझाडे सर यांनी केले.
या वेळी विद्यार्थ्यांचा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर सन्मान करण्यात आला. तसेच लहान मुलांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवश्री शिवाजी कवर यांनी संत रविदास महाराज यांच्या मानवतावादी व समतेच्या विचारांवर सखोल मार्गदर्शन केले. सर्व समाजांनी एकमेकांच्या जयंती एकत्र साजऱ्या केल्यास सामाजिक एकोपा अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष भगवान दादा क्षीरसागर म्हणाले, “आजपर्यंत अनेक जयंती पाहिल्या; मात्र अशी सर्व समाजाला सोबत घेणारी व एकजुटीचे दर्शन घडवणारी जयंती यापूर्वी पाहायला मिळाली नाही. समाजबांधवांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.”
यासोबतच चर्मकार समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिसोड चर्मकार महासंघाचे तालुका अध्यक्ष रमेश खिराडे, शहराध्यक्ष पांडुरंग घायाळ, दिनकर कानडे, राहुल घायाळ, गणेश घायाळ, राधाकिसन जुंजारे, गजानन पदमने, विजय राजगुरू, राजू राजगुरू, प्रशांत थोटे, लक्ष्मण कानडे, पंढरी राजगुरू, संतोष फुलसावंगे, संतोष वानरे, आश्रु कानडे यांच्यासह सर्व चर्मकार समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.
📌 संबंधित बातम्या :
- ▶️ शासनाला थकीत देयके निकाली काढायचे नाहीत का? शिक्षक-प्राध्यापकांचे पाच ते सहा वर्षांपासूनचे पैसे रखडले
- ▶️ देर आये दुरुस्त आये! केनवड येथे आ. अमित झनक यांच्या निधीतून उभारलेले तलाठी भवन अखेर लोकांच्या सेवेत
- ▶️ संत विचारांवर आधारित कार्यक्रमांना तरुणांची उपस्थिती
👉 अधिक अशाच सामाजिक, राजकीय व ग्रामीण भागातील बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.












