sambhaji nagar : लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून ३४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ‘वाळूजमध्ये’ valuj उघडकीस आली. सतीश गंगाधर बरगे satish gangadhar barage (रा. लायननगर, वाळूज) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
सतीशची आई अंतिकाबाई या नातेवाइकाच्या दशक्रिया विधीसाठी बाहेरगावी गेल्या होत्या. सतीश गंगाधर बरगे satish gangadhar barage घरी एकटाच होता. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुरेशचा बकवालनगरात राहणारा भाचा घरी आला असता त्यास मामा पंख्याच्या हुकला दोरीने गळफास घेतलेला दिसला. घाबरलेल्या भाच्याने या घटनेची माहिती आई व नातेवाइकांना दिली. नातेवाइकांनी पोलिसांच्या मदतीने सतीशला satish बेशुद्धावस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यास मृत घोषित केले.
नैराश्याने होते ग्रासलेले
वयाची तिशी ओलांडली तरी लग्न जुळत नसल्याने सतीश नैराश्यात होता. लहान भाऊ सुरेशचे लग्न झाले असून, आपले लग्न होत नसल्याने तो मद्याच्या आहारी गेला होता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. वाळूज पोलिस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.