jammu news : ग्रेनेट फेकले , १२ मिनिट गोळीबार आणि ५ जवान शाहिद

jammu news

jammu news : जम्मू-काश्मीरमधील ‘कठुआ’ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर सोमवारी पुन्हा एकदा हल्ला केला. यामध्ये पाच जवान शहीद झाले असून ६ जवान जखमी झाले आहेत. लोही मल्हार ब्लॉकच्या माचेडी machedi भागातील बद‌नोटा badnota  गावात ही घटना घडली. सध्या येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू असून, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

 

बिलावरमधील माचेडी-किंडली-मल्हार machedi kundli malhar रोडवर हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. येथे बदनोता गावाजवळ माचेडी-किंडली-मल्हार रस्त्यावर लष्कराच्या वाहनातून सुरक्षा दलाचे १० जवान नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. मल्हार रस्त्यालगतच्या टेकडीवर दहशतवाद्यांनी ठाण मांडले होतं. लष्करी वाहन पुढे जाताच दहशतवाद्यांनी आधी ग्रेनेड फेकले आणि नंतर आधुनिक शस्त्रांनी गोळीबार सुरू केला.

 

 

 

हल्ल्यामध्ये जवळपास ३ दहशतवादी सहभागी असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. तसेच हल्ल्यावेळी स्थानिक गाईडही दहशतवाद्यांसोबत असण्याची शक्यता आहे. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेचं म्हणणं आहे की, या हल्ल्यात त्यांच्या कॅडरने M4 असॉल्ट रायफल, स्निपर, ग्रेनेड आणि इतर शस्त्रे वापरली आहेत.