हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भावी पिढ्यांच्या खेळाच्या हक्कासाठी साखरखेर्डा ग्रामस्थांचा एल्गार; १.६२ हेक्टर सरकारी जमीन क्रीडांगणासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्याची मागणी

On: July 30, 2026 7:46 AM
Follow Us:
साखरखेर्डा क्रीडांगणासाठी सरकारी जमीन राखीव ठेवण्याची मागणी करताना ग्रामस्थ

साखरखेर्डा : समाधान सरकटे 

गावातील युवक आणि भावी पिढ्यांना हक्काचे क्रीडांगण मिळावे, यासाठी साखरखेर्डा येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. गावातील गट क्रमांक ८७० आणि ८४३ मधील सुमारे १.६२ हेक्टर सरकारी जमीन क्रीडांगणासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.

साखरखेर्डा येथील हे क्रीडांगण केवळ खेळाची जागा नसून गावातील युवकांच्या स्वप्नांचे मैदान असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या मैदानावर अनेक वर्षांपासून क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, धावणे, योग तसेच वयोवृद्ध नागरिकांसाठी वॉकिंगसारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.

क्रीडांगणाचे संरक्षण करून ते भविष्यातही गावासाठी उपलब्ध राहावे, यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वीपासूनच पाठपुरावा सुरू केला आहे. मैदानावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये किंवा या जागेचा इतर कारणांसाठी वापर होऊ नये, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

📢 गावातील ताज्या बातम्यांसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा
👉 WhatsApp Group Join करा

या संदर्भात १६ जुलै रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. या ग्रामसभेत उपस्थित ९५ टक्के ग्रामस्थांनी क्रीडांगणाची जागा सुरक्षित ठेवण्याबाबत एकमुखी ठराव मंजूर केला होता. त्यानंतर २७ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे आणि भूमी अभिलेख उपअधीक्षक रचना जाधव यांना निवेदन देण्यात आले.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अनेक वर्षांपासून गावातील खेळाडू आणि ग्रामस्थ स्वखर्चातून तसेच श्रमदानातून या मैदानाचा विकास करत आहेत. त्यामुळे महसूल आणि क्रीडा विभागाच्या नोंदीमध्ये ही जागा कायमस्वरूपी क्रीडांगणासाठी सुरक्षित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

साखरखेर्डा हे मोठे गाव असून येथे विविध क्रीडा स्पर्धा, शालेय स्पर्धा आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे हे मैदान गावाच्या विकासासाठी आणि युवकांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या मागणीला गावातील युवक, क्रीडाप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि भूमी अभिलेख विभागाकडे करण्यात आली आहे.


हेही वाचा :

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेडराजामार्गे रेल्वेची मागणी आणि जिजाऊ जन्मभूमी

जिजाऊंच्या जन्मभूमीला रेल्वे कधी? जालना-खामगाव मार्ग सिंदखेडराजामार्गे करण्याची जोरदार मागणी; “विकासाच्या नकाशावर सिंदखेडराजा का नाही?”

सिंदखेडराजा दुष्काळ बाबत डॉ शशिकांत खेडेकर यांचे प्रशासनाला निवेदन

पावसाने पाठ फिरवली, सिंदखेडराजा तालुक्यातील खरीप पिके संकटात; माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची प्रशासनाला थेट भेट

चिखलीतील उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात आनंदराज आंबेडकर

चिखलीत उपवर्गीकरणाविरोधात हजारो भीमसैनिकांचा महामोर्चा; आनंदराज आंबेडकर म्हणाले, ‘५९ जातींची एकजूट कायम ठेवा’

मोताळा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार संजुभाऊ गायकवाड यांची पाहणी

मोताळ्यात दुष्काळाचे सावट: आमदार संजुभाऊ गायकवाड यांचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट संवाद

देऊळगाव राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे मनसेचे निवेदन

देऊळगाव राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; मनसेचा तहसीलदारांना इशारा

बुलढाण्यातील पळसखेड चक्का येथील मुंढे परिवारातील दोन चुलते-पुतण्यांच्या निधनाची बातमी

एकाच परिवारातील दोन आधारवड हरपले; देशसेवेतील सुभेदार पुत्र वडिलांच्या अखेरच्या निरोपापासून दूर

Leave a Comment