हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्कादायक वास्तव! साखरखेर्ड्यात डिझेल टंचाईमुळे शेकडो ट्रॅक्टर थांबले, शेतीची कामे खोळंबली

On: March 28, 2026 12:12 PM
Follow Us:
साखरखेर्डा पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरची रांग, डिझेल टंचाईमुळे शेतकरी अडचणीत
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा |२८ मार्च २०२६

साखरखेर्डा येथे पेट्रोल आणि डिझेल टंचाईचे गंभीर चित्र समोर आले असून पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डिझेल मिळत नसल्यामुळे शेकडो ट्रॅक्टर पंपावर उभे असून शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. शासनाकडून टंचाई नसल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात मात्र शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

साखरखेर्डा येथे असलेल्या दोन्ही पेट्रोल पंपांवर गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन पंपावर थांबले असून डिझेल मिळवण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

पूर्वी शेतकरी कॅनमध्ये २० लिटर डिझेल घेऊन जात होते, मात्र आता कॅनमध्ये डिझेल देणे बंद झाल्याने ट्रॅक्टर थेट पेट्रोल पंपावर आणावे लागत आहे. यामुळे पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली आहे.

दर आठवड्यातून एक ते दोन वेळाच टॅंकर उपलब्ध होत असल्याने आणि शासकीय सुट्ट्यांमुळे पुरवठा उशिरा होत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. याचा थेट परिणाम शेतीवर होत असून एप्रिल-मे महिन्यातील नांगरणी आणि रोटावेटरची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.

एकीकडे शासनाकडून डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे साखरखेर्ड्यातील वास्तव वेगळेच चित्र दाखवत आहे. या संपूर्ण परिस्थितीत सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून शेतीची कामे अडचणीत आली आहेत.

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला फॉलो करा

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment