हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखला काकड प्रकरणाच्या निषेधार्थ साखरखेर्डा कडकडीत बंद; महिलांवरील अमानुष अत्याचाराने संताप

On: February 22, 2026 5:37 PM
Follow Us:
चिखला काकड घटनेच्या निषेधार्थ साखरखेर्डा बंद दरम्यान बंद असलेली बाजारपेठ
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा |बुलढाणा जिल्हा|२२ फेब्रुवारी २०२६

चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा वादातून महिलांवर झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ साखरखेर्डा शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. नागरिक, व्यापारी, युवक आणि शिवप्रेमींनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवली. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

बिबी पोलीस स्टेशन हद्दीतील चिखला काकड येथे काही दिवसांपूर्वी अज्ञात युवकांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना केली होती. पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावर ग्रामपंचायतीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीदरम्यान उबाठा महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांनी पुतळा हटवण्यास तीव्र विरोध दर्शविला. त्या आणि इतर महिला पुतळ्यासमोर ठिय्या देऊन बसल्या होत्या.

दरम्यान, सरपंच काही युवक व महिलांसह घटनास्थळी आले. यावेळी संजीवनी वाघ व इतर महिलांना बेदम मारहाण करण्यात आली तसेच अंगावरील कपडे फाडण्याचा अमानुष प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरताच शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने चिखला काकड येथे दाखल झाले.

माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना आमदार संजय गायकवाड, जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर, आमदार श्वेता महाले यांच्यासह अनेक नेते व हजारो शिवप्रेमींनी घटनास्थळी भेट दिली. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे मनोज जरांगे यांच्या आगमनाने घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

या घटनेच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते संतोषराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली साखरखेर्डा पोलीस स्टेशन येथे बंदचे निवेदन देण्यात आले होते. विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांनी बंदला पाठिंबा दर्शविला.

आज सर्वपक्षीय आवाहनाला प्रतिसाद देत साखरखेर्डा शहर पूर्णपणे बंद राहिले. बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ आणि व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात आली. नागरिकांनी शांततेत निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

 


👉 संबंधित बातम्या


📢 ताज्या व विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment