robbery news : शेतात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून सोन्या- चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १६ जुलै रोजी रात्री आंचरवाडीजवळील शिवारात घडली ‘वसंतनगर’ येथील रहिवासी असलेले वृध्द दाम्पत्य विष्णू फुलसिंग राठोड vishnu fulsingh rathod व पत्नी जिजाबाई विष्णू राठोड jijabai vishnu rathod हे दोघे शेतातील टिनशेडमध्ये राहतात.
१६ जुलैच्या रात्री जेवण आटोपून हे वृध्द दाम्पत्य लाकडी बाजेवर झोपले असताना रात्री १० वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी लोखंडी रॉडने विष्णू राठोड vishnu rathod यांच्या पायावर, पाठीवर जबर मारहाण केली तसेच जिजाबाई राठोड jijabai rathod यांना लोखंडी रॉडचा धाक दाखवत गळ्यातील दोन मंगळसूत्र, कानातील सोन्याची फुले, सोन्याची बारीक मणी पोत, हातातील चांदीच्या पाटल्या असा एक लाख रुपयांचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. माहिती मिळताच अंढेरा ठाणेदार विकास पाटील आणि गोरख राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली चोरटे ज्या दिशेने पळाले त्या दिशेने जाफराबादपर्यंत jafrabad रात्रीच शोध घेतला.
परंतु, चोरटे हाती लागले नाही. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अशोक लांडे यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट दिली तसेच देऊळगाव राजा उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी बुधवारी घटनास्थळ गाठून माहिती घेतली. याप्रकरणी जिजाबाई विष्णू राठोड यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३ (५) अंतर्गत गन्हा दाखल केला आहे.
मारहाणीत राठोड गंभीर जखमी
चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत विष्णू फुलसिंग राठोड हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले असून, त्यांना रात्री त्यांचा मुलगा भगवान विष्णू राठोड याने खासगी रुग्णवाहिकेतून चिखली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.