Buldhana : मावशाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या मावशाला बेड्या.

 

देऊळगाव राजा/प्रतिनिधी

 

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.मुलीच्या घरी पाहुणा गेलेल्या नराधमानेच केला सालीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार. सविस्तर वृत्त असे की अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावामध्ये रात्री घरामध्ये झोपलेले असताना सख्ख्या मावशाने अल्पवयीन व मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अशा मुलीच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

 

 

सविस्तर वृत्त असे की अंधेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावामध्ये जालना येथील मुलीचा मावसा हा २ दिवस झाले गावी आलेला होता. घटना घडली त्या दवशी सर्वांनी सोबत जेवण केले. व रात्री सर्वजण झोपले. रात्री झोपलेले असताना अंधाराचा फायदा घेत मुलीच्या मावशीन मुली जवळ जाऊन तिच्यावर बलात्कार केला. व तेवढ्याच रात्री मुलगी रडायला लागली तेव्हा सर्वजण जागी झाली परंतु तोपर्यंत मुलीचा मावसा हा त्याच्या जागेवर जाऊन झोपला. परंतु मुली सोबत घडलेली ही सर्व आपबीती मुलीने आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी लगेच पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

 

 

 

मुलीची आपबीती ऐकून अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी आरोपी रामप्रसाद श्रावण अंभोरे वय ३२ वर्ष रा. चंदंजिरा जालना याला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. दुय्यम ठाणेदार जारवल यांनी आरोपीला तात्काळ अटक करून.विरुध्द कलम ६५ (१) ६४ (२) (f) ६४ (२) (i) ७४, BNS बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.