जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील
रिसोड तालुक्यातील रिठद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जवळपास अर्धा तास रिठद मार्गावरील सर्व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. बस स्थानक परिसर घोषणांनी दुमदुमून गेला आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा स्वर शासनापर्यंत पोहोचला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
आंदोलनात शेतकऱ्यांनी शासनाकडे खालील मागण्या जोरदारपणे मांडल्या –शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करारब्बी हंगामासाठी हेक्टरी १० हजार रुपये मदत द्यावी
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने द्यावीपिकविमा रक्कम त्वरित खात्यात जमा करावी.
हेही वाचा.
हवामान विभागाचा इशारा! पुढील 24 तास घराबाहेर पडू नका – 55 किमी वेगाने वारे व मुसळधार पाऊस.
शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करावाया सर्व मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा,
अन्यथा मोठं राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेते दामू अण्णा इंगोले यांनी दिला.
या रास्ता रोको आंदोलनादरम्यान वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शेटे आणि त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
“आम्हाला आश्वासन नको, थेट मदत आणि न्याय हवा, अन्यथा शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरेल,” अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष रिठदकडे वेधले गेले आहे.















