नारायणराव आरु पाटील /प्रतिनिधी
रिसोड तालुक्यातील पारडी तिखे ते रिठद हा रस्ता नेहमी वाहतुकीने गजबजलेला असतो या रस्त्यावरील शाळेत जाणारे -येणारे विद्यार्थी तथा प्रवासी पार्डी तिखे गावाजवळील नाल्याला मुसळधार पावसामुळे पाणी आले असून शिरपूर ते बेलखेडा रस्ता बंद झाला आहे. हा रस्ता बंद होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव यांनी शिरपूर ते मालेगाव रस्त्यावरील नेहमीच पावसाळ्यात पावसामुळे पुलावरून पाणी जाते तेथे पुलाची उंची वाढूऊन नवीन पुल करण्यात यावा.
अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. तसेच रिठद गावालगत असलेल्या अडोळ नदीला सुद्धा असंच मुसळधार पावसामुळे प्रथमतः पाणी आले आहे त्यामुळे विहिरी ,बोरवेल इत्यादीची पाण्याची काही प्रमाणात पातळी वाढणार असे परिसरातील शेतकऱ्यांना वाटते