
बुलढाणा / प्रतिनिधी
‘तलवार’ या प्रकरणावरून सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये गरमागरमेचे वातावरण सुरू बुलढाणा विधानसभा नव्हेच तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या तलवारीचा विषय सोशियल मीडियामध्ये सध्या चर्चेत आहे. ऐन विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे विरोधकीय सर्वच पक्षांचे विशेषतः काँग्रेसवाल्यांनी आ. संजय गायकवाड यांच्यावर जोरदार राजकीय प्रहार केले आहेत. तर प्रत्युत्तर देतांना आ. गायकवाड यांचेही जोरदार प्रहार सुरु असून, मतदार संघातील राजकारणाला या आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्यातील वातावरण गरमा गरमचे बनले आहे. आणि ज्याच्यात त्याच्या तोंडामध्ये तलवार हाच विषय ऐकु ऐत आहे.
सविस्तर वृत्त असे की, आ. संजय गायकवाड यांचे सुपूत्र तथा धर्मवीर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मृत्यूंजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार १५ ऑगस्टला सायंकाळी मातोश्री जनसंपर्क कार्यालयापुढे अभिष्टचिंतन सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी मतदार संघातून युवकांची प्रचंड गर्दी जमली होती. शाहीर डी. आर. इंगळे यांच्या शाहीरी पोवाडे व गीतांनी वातावरणात ऐतिहासीक जल्लोष व वीरत्व संचारले होते.
या वातावरणाला पाहून आ. संजय गायकवाड यांनी केक कापण्यासाठी तलवार बोलवली. तो केक कापून तलवारीनेच तो त्यांनी मृत्यूंजयसह उपस्थित त्यांच्या कुटुंबीयांना भरवला. या घटनेचा व्हिडीओ दोन दिवसांनी सोशल मिडीयावर व्हायरल होताच, विरोधकांनी आ. गायकवाड यांच्यावर राजकीय वार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी गायकवाड यांचे कृत्याचा निषेध करत सरकारला धारेवर धरले.
काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके व ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनीही ज्याप्रमाणे अन्य प्रकरणात तलवारीने केक कापण्यावरुन गुन्हा दाखल झाला तसा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र आ. संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापण्यात कुठलेच गैरकृत्य नसल्याचे सांगून ही तलवार कुणाच्या मानेवर चालली नाहीतर केकसाठी चालली, असे सांगून ज्यांच्यावर असे गुन्हे दाखल आहे तेही रद्द करुन आणू शकतात असा कायद्याचा आधार आधार घेऊन विरोधकांना आ. संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिला आहे