
वाशिम जिल्हा प्रतिनिधि/नारायणराव आरू पाटील
दि. ६/१०/२०२४ मंगरुळनाथ तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणुन सुप्रसिद्ध असलेली शेलुबाजार येथे चहाच्या कॅंटींगमध्ये व्यवसायासाठी ईंडीयंन घरगुती गॅस सिलेंडरचा उपयोग मागील अनेक दिवसापासुन खुलेआम सुरु आहे त्यामुळे यांना भय कुणाचे? की आशिर्वाद म्हणावा ! हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. या बरोबर आरोग्यास घातक असलेल्या तंबाखुच्या पुड्या सुद्धा लटकविलेल्या दिसत आहेत त्यामुळे याबाबतीत सुद्धा आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच चहासाठी वापरण्यात येणारे दुध सुद्धा ५ गंजामध्ये उघडे ठेवलेले स्पष्ट दिसत असुन त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार हा शेलुबाजार मध्ये खुलेआम सुरु आहे .”सत्य काय ते तपासणे गरजेचे, तरी संबंधित विभागाने तातडीने “योग्य” कारवाई ती करावी. अशी मागणी जनतेतुन होत आहे.