जिल्हा प्रतिनिधी – नारायणराव आरू पाटील
रिसोड तालुक्यातील रिठद गावात मोटरसायकल चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. रिठद मोटरसायकल चोरी प्रकरणात जगन काशीबा आरू यांची होंडा कंपनीची एमएच ३७ ए जे ५८२० क्रमांकाची मोटरसायकल वाशिम ते रिसोड राज्यमार्ग क्रमांक ५१ वरून, बालाजी महादू आरू यांच्या शेताजवळून चोरीला गेली आहे.
घटना दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान घडली. त्या वेळी शेतकरी जगन काशीबा आरू हे आपल्या शेतात स्प्रिंकलर पाईप बदलण्यासाठी गेले होते. त्यांनी मोटरसायकल रस्त्याच्या कडेला उभी केली होती, पण काही वेळानंतर शेतातून परतल्यावर त्यांना मोटरसायकल गायब झाल्याचे दिसून आले.
या प्रकारामुळे रिठद गावात आणि आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच जगन आरू यांनी तत्काळ वाशिम पोलिस स्टेशनला तसेच स्थानिक बीट जमादारांना या मोटरसायकल चोरीबाबत कळवले. पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार दोन दिवस परिसरात गाडीची पाहणी करण्यात आली, परंतु गाडी मिळाली नाही.
हे पण वाचा.
त्यामुळे अखेर ३ नोव्हेंबर २०२५ रोजी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली.या प्रकरणात पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता घटनास्थळी येऊन पंचनामा केला. बीट जमादार अंभोरे आणि त्यांचे सहकारी यांनी तपासाची प्राथमिक जबाबदारी घेतली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या रिठद मोटरसायकल चोरी प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाशिम जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. पोलिसांनी नागरिकांना आपल्या वाहनांची योग्य देखरेख ठेवण्याचे आवाहन केले आहे.
👉ताज्या घडामोडी साठी आत्ताच आपल्या kattanews.in या न्यूज पोर्टल ला भेट द्या.










